Header Ads Widget

धुळे जिल्ह्यामध्ये. शिरपूर आणि शिंदखेडा या दोन तालुक्यांमध्ये तर पावसाचे प्रमाण खूपच कमी, दुबार पेरणीनंतरही संकट कायम; पाण्याअभावी पिकाची वाढ खुंटली

धुळे : ऑगस्ट महिना सुरू झाला तरी धुळे जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झाला नाही. शिरपूर आणि शिंदखेडा या दोन तालुक्यांमध्ये तर पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाअभावी पेरणी केलेले पहिले पीक वाया गेले; परंतु दुबार पेरणी केल्यानंतर जेमतेम उगवलेल्या पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटली असल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये आणखीनच वाढ झाली आहे.

धुळे जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी राजा चांगलाच चिंतेत सापडला आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अद्यापही धुळे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने पेरणी केलेले पहिले पीक वाया गेले आहे. परंतु दुबार पेरणी केल्यानंतर देखील जेमतेम उगवलेलं दुसरे पीक देखील पाण्याअभावी वाढ खुंटल्याने येईल की नाही याची चिंता आता शेतकऱ्याला भेडसावू लागली आहे.

दिलेले खतही वाया

दरवर्षीच्या तुलनेत यंदा धुळे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिना सुरू झाला तरीदेखील जोरदार पाऊस झाला नाही. दुबार पेरणी केल्यानंतर अधूनमधून रिमझिम येणाऱ्या पावसामुळे पीक तर जगले; परंतु त्याची वाढ होतच नाही. खत टाकल्यानंतर देखील पाऊस होत नसल्याने टाकलेले खत जमिनीमध्ये वीरघळत नसल्याने खत टाकून देखील काहीच फायदा रोपाला होत नाहीये. परिणामी जसं तसं पिक वाढीला लागल तरी उत्पन्नामध्ये घट येणारा हे मात्र निश्चित आहे.

खर्च निघणेही कठीण

महागडे बियाणे त्याचबरोबर महागडी खतं तसेच मजुरी यांचा तरी खर्च निघेल का? याची चिंता आता शेतकऱ्याला वाटू लागली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने तरी कृपादृष्टी करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.



Post a Comment

1 Comments

  1. 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

    ReplyDelete