धुळे | प्रतिनिधी
*जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये दिनांक १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहेत. आमदार कुणाल पाटील यांचा १८ सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.* धुळे जिल्हयातील गोरगरीब रूग्णांना अधिकाधिक उत्तम सेवा मिळावी हा यामागील उददेश आहे.
जवाहर मेडिकल फाउंडेशन मागील ३१ वर्षांपासून धुळे जिल्हयात आरोग्य सेवा देत आहे. आतापर्यंत फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये हजारो रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. १ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान शस्त्रक्रियांसह, बेड, नर्सिंगसह अन्य सेवा मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय लॅब व अन्य तपासण्यांवरही मोठया प्रमाणावर सूट देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील यांनी दिली आहे.
जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, आमदार कुणाल पाटील, डॉ.ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मधुकर पवार आदींनी यापूर्वी १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान मोफत आरोग्य सुविधांसाठी कॅम्प आयोजित केला होता. परंतु आता पुन्हा महिनाभर आरोग्य सुविधा मोफत या निर्णयामुळे पुन्हा तब्बल महिनाभर सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे.
यात डॉक्टरांची तपासणी, किरकोळ तसेच मोठया शस्त्रक्रियांचा डॉक्टरांचा खर्च, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस हा कोणताही खर्च रूग्णाला करावा लागणार नाही. केवळ औषधी, लॅबच्या तपासण्या, एक्स रे, सीटीस्कॅन, औषधे आदींचा खर्च रूग्णांना करावा लागेल. तरी धुळे जिल्हयातील रूगणांनी बालरोग विभाग, नेत्ररोग, त्वचा विकार, हाडांचे विकार, छातीचा विकार, स्त्री रोग आदी सर्वच विभागातील आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा असे अवाहन संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.

1 Comments
patildnyaneshwar650@gmail.com
ReplyDelete