आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द..हे कधी सांगितले तर रात्री १०.३० वाजता तो पर्यंत कित्येक परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी 300/500 किमी प्रवास करत होते.त्यांच्या झालेल्या धावपळीचे काही चीज झाले? टोपे साहेब,निदान दोन दिवस आधी सांगितले असते तर त्या परिक्षार्थींची धावपळ तरी वाचली असती.निर्णय जाहीर करताना निदान सामान्य गरिब विद्यार्थ्यांचा तरी विचार करायला हवा,किती विद्यार्थी यांचे कष्ट,प्रवासाला लागणारे पैसे पाण्यात गेले आणि झालेला मनःस्ताप तर वेगळाच.विद्यार्थ्यांचे नुकसान करून खाजगी कंपन्या मोठ्या करायच्या बंद कराव्यात महाविकास आघाडी सरकारने..
*आरोग्य मंत्री टोपे साहेबांना कोरोनाची तिसरी लाट येणार आहे हे कळाले,पण परीक्षेचा गोधळ होणार आहे हे नाही कळले .।*
सरकारी नोकरीसाठी खाजगी कंपन्या का.? न्यासा कम्युनिकेशन ह्या कंपनी विरोधात अनेक तक्रारी असून ही कंपनी काळ्या यादीतील आहे, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत असाच गोंधळ उडाला होता काही पदांचा तर निकाल राखीव ठेवण्यात आलेला असून,आत्ता ही ढिसाळ नियोजनाच्या अभावामुळे आज आणि उद्या होणा-या परीक्षा रद्द करण्यात आल्या त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग या सर्व परीक्षा घेण्यास तयार असतांना राज्य सरकार (मविआ) बाह्य स्त्रोत यांच्या (खाजगी परीक्षा घेणा-या कंपन्या) मार्फत घेण्यास अट्टाहास का.? मुळात बाह्य स्रोत संस्थांकडून परीक्षा घेणे म्हणजे आपण तांत्रिक दृष्ट्या किती असमर्थ आहोत हेच सिद्ध होतंय, त्यामुळे निदान पुढे तरी असला हलगर्जीपणा टाळावा व महाराष्ट्र शासनाच्या सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात.
बहुतेक परिक्षार्थींची सद्य परिस्थिती पाहता ज्या परीक्षार्थींनी त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र निवडले होते ते न भेटता दुसऱ्या जिल्ह्यात त्यांचे परीक्षा केंद्र आले ते त्यांच्या गावापासून परीक्षा केंद्र दूरअसल्यामुळे कालच येऊन बसले होते तर काही परीक्षार्थी आजून प्रवासातच होते. सर्वांचीच रहाण्याची,जेवणाची सोय असेल असे मुळीच नाही,कोविड परिस्थिती मुळे बहुतेक लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे पण एक दिवस काढायचा कसातरी म्हणून मनाला समजूत घालून हे परीक्षार्थी आलेत मनात एकाच अपेक्षा घेऊन की आपण आता परीक्षा देऊन काहीतरी भविष्य घडवू... पण आपण असा अचानक घेतलेला निर्णय सर्वांना कळेल म्हणजे सर्व परीक्षार्थीं पर्यंत पोहचेल असे नाही... सकाळी लवकर उठण्याचा उद्देशाने काही बरेच परीक्षार्थी लवकर झोपले असतील..ते पण जशी त्यांची परिस्थिती तसे ते काही बस्थानाक तर काही परीक्षा केंद्राच्या आवारात निवारा घेत उद्याचा एक आशेच्या किरणांची वाट बघत बघत झोपले असतील..
राजेश टोपे साहेब माझी आपणांस एक विनंती आहे की पुढील तारीख ठरविण्याच्या अगोदर प्रत्येक परिक्षार्थीने जे परीक्षा केंद्र / परिक्षेसाठीचा जिल्हा निवडले आहे तेच देण्याचा प्रयत्न करावा किंवा त्यांना एक दिवसाचा राहण्याचा व जेवणाचा खर्च देण्यात यावा ही विनंती...
गोरगरीब तरुणांनी तिकिटासाठी पैसे जमवताना काय दिव्य पार पाडले असतील याची सरकारला जाणीव तरी आहे का?एखाद्या विषयात गोंधळ झाला तर समजू शकतो पण राज्य सरकारं तर प्रत्येक विषयात फक्त आणि फक्त गोंधळ निर्माण करत आहे. काही दिवसांपूर्वीच लोणकर या तरुणानं ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभाराला कंटाळून आत्महत्या केली.आज जी परिक्षा रद्द झाली परीक्षार्थींपैकी कोणी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले तर त्याला कोण जबाबदार असणार? मुख्यमंत्री? आरोग्यमंत्री.?
सर्व मुलांची होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन भरपाई म्हणून सर्व मुलांना खर्च झालेला प्रवास भत्ता राज्य सरकारने द्यावा. आरोग्य विभागाच्या परीक्षेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी राजीनामा द्यावा किंवा राज्य सरकारने त्यांना निलंबित करावे..!
✍️शिवश्री संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे - 9689446003
जिल्हाध्यक्ष पुणे
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य.. 9005546004

3 Comments
किती त्रास झाला माला मला तर रडू आलाय टोपे तुम्ही एसी मधे झोपला असाल
ReplyDeleteनिगरगट्ट राजकारणी लोक...
ReplyDeleteएकदम खरंय
ReplyDelete