आम्ही देशाचं भविष्य आहोत,माझी शाळा माझे भविष्य..✍️संतोषबादाडे
सध्या राज्यात कोविडची परिस्थिती आहे,त्यात देशाला वारंवार लॉकडाऊन सहन करावं लागतं आहे यामुळे राज्यात शिक्षणावर मोठा परिणाम होतं आहे पुन्हा नवीन बेरीएंट डोकवर काढले आहे. फक्त शिक्षण व्यवस्था ठप्प करण्यात आली आहे एकीकडे राज्यात दारु बार,हॉटेल सिनेमागृहे धार्मिकस्थळे सुरु मात्र शाळा महाविद्यालयांना टाळेबंदी करण्यात आली आहे.केंद्र सरकाराने व राज्य सरकारने मोठा बाजागाजा करीत लसीकरण सुरु केले.त्यात ज्यांचे वय 18 वर्षातील सर्वाचे लसीकरण करण्यात आले,त्यात बहूसंख्य कॉलेज च्या विद्यार्थी यांनी आपल लसीकरण करवून घेतलं.असून त्याची सर्टीफेकीट ही कॉलेज ला सादर केली आहे.हे केल्यानंतर काही दिवस कॉलेज सुरळीत सुरु झाले पण काही दिवसात पुन्हा बंद करण्यात आले आणि पुन्हा विद्यार्थी यांना नको ते आॕनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले.साहेब गरिब विद्यार्थी कसे शिक्षण घेणार..सर्वसामान्य कुटूंबांतील शैक्षणिक सामाजिक स्तरावर जे नुकसान झाले आहे ते भरुन येणार नाही आणि म्हणूनच शासनाने शाळा पुन्हा बंद करताना अतिशय विचार पूर्वक निर्णय घेणे अपेक्षित आहे राज्यात आणि जिल्हात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत,त्यात पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.तर रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.या दरम्यान जिल्हात लग्नसमारंभ राजकीय सभा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निर्बंध घालण्यात आले असून या कार्यक्रमांना केवळ 50 लोकांना उपस्थिती राहण्यास परवानगी देण्यात आली.तर दारु बार हॉटेल रेस्टाॕरंट मॉल चित्रपटगृह उपहारगृह मार्केट कॉम्प्लेक्स खासगी अस्थापना आदीना 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.मात्र या दरम्यान शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांतही संताप व्यक्त केला जात आहे..।
*समाजाला महत्त्वाचे काय.?*
ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवून 11 लाख ओबीसी लोक प्रतिनिधी संपविले गेले.या सामाजिक अपघाताची ज्याच्या मनात आणि गावात जाणीवच होत नाही ते मागास वर्गीय म्हणजेच ओबीसी आहोत हेच ज्यांना माहीत नाही..बहूजन मराठा समाजाला समाजकारण करणाऱ्या बांधवानी समजून घेतले पाहिजे.मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण राजकीय संपल्याचे संकट समजतं नाही..म्हणून मराठा बहूजन शाळा कॉलेज नको धार्मिकस्थळे पाहिजे.आरक्षण नको धर्म पाहिजे,आम्ही लहान असतांना देवा देवीकांच्या जन्म मृत्यू च्या गोष्टी कथा प्राथमिक शिक्षण घेतांना सांगितल्या व शिकविल्या जातातत्यांचे संस्कार लहानपणापासून मुलामुलींवर होतात.लहान असतांना देवांची मनो भावी पुजा अर्चा केलीतर देव कसे चमत्कार करुण प्रसन्न होतात हे शिकविल्या जाते.घरी कर्मकाड अंधश्रद्धा पुजा पाठ करत असतांना कुणीही विरोध करत नाही.त्याचा परिणाम लहान मुलामुलीवर होता. कुटूंबांतील प्रमुख त्यांचा तर्क अर्थ शोधण्याचा प्रयत्न ते कधी करीत नाहीत..मराठा आणि ओबीसी आरक्षण गेल्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलना पेक्षा मोठे व तिव्र आंदोलनाची अपेक्षा होती पण गर्वसे कहो हम हिंदू हे म्हणणारे मराठे व ओबीसी पेटून उठलेच नाही.म्हणून समाजाला शिक्षण देणारे शाळा कॉलेज नको,मंदिर पाहिजेत ते सर्वाना समान न्याय देतील म्हणूनच आरक्षण बंद झाले पाहिजे. कारण गावागावात शाळेच्या कामासाठी गावकरी एकत्र येऊन मदत करीत नाहीत.ते म्हणतात ते सरकारी काम आहे आपले नाही पण गावामध्ये एखादे धार्मिकस्थळ बांधण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सढळ हस्ते मदत करतात त्यात समाजाची चढावळ लागते. धर्मानूसार त्याचा आर्थिक फायदा कोणाला होतो.तिथे कोणी अधिकार सांगितला तर काय होते?
मराठा बहूजन समाजाची शिक्षणामुळे प्रगती झाली,देव धर्म पंचांग मुहूर्त कर्मकाड अंधश्रद्धा पाळून किंवा सत्य नारायण करुन आणि इतर सर्व उपवास पकडून किंवा नवस फेडला म्हणून नाही..आता समाजाने विचार केला पाहिजे. मराठ्यासह सर्वाना आरक्षण पाहिजे पण दलाल चॕनल मीडिया जाती जातीत भांडणे लावत आहेत. धर्मानूसार आपण सर्व हिंदू आहोत.मग धार्मिकस्थळाच्या उत्पन्नावर सर्वाना समान अधिकार का नाही शाळा, कॉलेज काढले तर मुलामुलींना लहान पणापासून अज्ञान व विज्ञान कळेल, आज पर्यत धर्माने सांगितले ते मुला मुलीनी ऐकले तेच शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या गेले.शाळेत रावणाला दहा तोंड होती,पण तो आईच्या पोटातून कसा बाहेर आला यांचे उत्तर मिळाले नाही..असे ही सांगितल्या जाते रावण महापंडित होता,मग आज पर्यंत एकही पंडितांच्या मुलांचे नाव रावण का नाही?
शाळा,कॉलेजमध्ये महापुरुषांचे विचार सांगितल्या गेले पाहिजेत, वैचारिक परिवर्तन विचार मुलामुलींच्या मनामनात तयार झाले पाहिजेत. त्यासाठी इतर प्रश्न सोडविण्यासाठी धार्मिकस्थळ नाही तर शाळा कॉलेज पाहिजे.धर्म नाही अधिकार पाहिजे मराठा बहूजन समाजाला शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे आरक्षण नको धर्म पाहिजे असे काही लोक म्हणतात.केंद्र सरकार सार्वजनिक शिक्षण हॉस्पिटल रेल्वे आणि इतर सरकारी मालमत्ता उद्दोगधंदे यांचे खासगीकरण यशस्वी पणे होत असल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे..म्हणून साहेब सांगा दारु महत्त्वाची कि शाळा, आणि समाजाला पण काय महत्त्वाचे पाहिजे त्यासाठी विचार केला पाहिजे.म्हणून आम्हांला असे माझ्या सारख्यांना लिहावे लागते कि समाजाला शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे..
प्रिय कोरोना बेरीएंट तू इतरत्र कुठेच न जाता फक्त आमच्या शाळेत चं का बरं येतो....!
*आम्ही देशाचं भविष्य आहोत.*
*माझी शाळा माझे भविष्य*
*✍️ शिवश्री संतोष शकूंतला आत्माराम*
*बादाडे - 9005546004*
*जिल्हाध्यक्ष पुणे ..*
*जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,*
*महाराष्ट्र राज्य..📚🖊️🤝🚩💐*

1 Comments
बरोबर आहे.... सर्व पक्ष भांडवलदारी मनुवादी आहेत
ReplyDelete