साक्री- साक्री तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, निवृत्त प्राचार्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठा महासंघासह विविध सामाजिक संघटनांचे सक्रीय पदाधिकारी, चळवळीतील अग्रणी अण्णासाहेब बी.एम. भामरे हे काही दिवसांपूर्वी एका भिषण अपघातातून सहीसलामत बचावले होते. धुळ्याहून साक्रीकडे आपल्या वाहनातून स्वत: वाहन चालवित जात असतांना समोरून येणार्या कंटेनरने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने वाहन रस्त्याच्या कडेला अक्षरश: चेंडू प्रमाणे फेकले गेले परंतु केवळ सीट बेल्ट लावल्यामुळे ते बालंबाल बचावले. आयुष्यभर केलेले सेवाभावी सत्कृत्य त्यांच्या कामी आले. अपघात झाल्यापासून त्यांच्या साक्री येथील निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी हितचिंतकांची अद्यापही वर्दळ सुरु आहे. ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य बी. एम. भामरे अण्णा यांच्या साक्री येथील निवासस्थानी जावून मराठी पत्रकार परिषदेचा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या नात्याने ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यात. यावेळी खान्देशातील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार सर यांनीही आवर्जून उपस्थित राहून शुभचिंतन केले.
.

1 Comments
On the contrary, it’s not solely the best-in-class roulette type but additionally 점보카지노 among all on line casino games. That’s because of|as a outcome of} it has a down-to-earth house edge at only one.35%. The French roulette wheel also has a single zero pocket which automatically makes the home edge low. When it comes to on line casino video games, roulette certainly one of the|is among the|is doubtless certainly one of the} easiest to study and play.
ReplyDelete