अमळनेर, प्रतिनिधी- येथील निम ग्रामसेवकाने वीट भट्टी चालवण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेतल्याने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून सोमवारी अटक केली.
अमळनेर तालुक्यातील निम येथे वीट भट्टी चालवण्यासाठी एकाने महसूल विभागाकडे सहा हजार रुपये रॉयल्टी भरली होती. तरीसुद्धा ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला लागेल व त्यासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच ग्रामसेवक श्री. राजेंद्र लक्ष्मण पाटील यांनी मागितली. तक्रारदाराने जळगाव येथे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर तक्रारीची शहानिशा करून झाल्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्यामुळे सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली.
ही कारवाई डी वाय एस पी शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.
0 Comments