सी.जी.वारूडे (प्रतिनिधी-सुजान ना.)
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करण्यात आला.व 'विद्यार्थी आरोग्य फेर तपासणी' करण्यात आली.
यावेळी वरील कार्यक्रमाचे अध्यक्ष
विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय, आबासो.श्री.एस.ए.कदम होते.व प्रथमतः विद्यालयातील पटांगणावर सामुहिक 'राष्ट्रीय मतदार दिन' विषयक सामुहिक 'मतदार प्रतिज्ञा' घेण्यात आले तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी मतदार विषयक हक्क,अधिकार,
वयोमर्यादा व निवडणूक कार्यकाल,
मतदार नाव नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र वगैरे मनोभाव मार्गदर्शन केलेत.
तद्नंतर विद्यालयात आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका शिंदखेडा टीम अंतर्गत विद्यार्थी आरोग्य फेर तपासणी डाॅ.उज्ज्वलपाटील,डाॅ.प्रेरणा पाटील व आरोग्य विभाग टीम इ.उपस्थितांच्या माध्यामातून विद्यार्थींना वैयक्तिक आरोग्य विषयक महत्त्व व सार्वजनिक स्वच्छता बाबत महत्त्व पटवून दिलेत.
यावेळेस कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग व मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार श्री.पी.आर.पाटील यांनी मानले.
0 Comments