Header Ads Widget

*हारकर भी जितनेवालेको बाजीगर कहेत है|* *पर आखिर जो जिता वही सिकंदर|* *सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील अभिनंदन!*


    
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
             नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक अत्यंत रंगतदार आणि लक्षवेधी झाली. त्यात सत्यजीत तांबे लढले जिंकले त्यांचे अभिनंदन! सत्यजीत तांबे यांना राजकारणाचा खूप मोठा वारसा आहें. त्यांचे वडील मा सुधीर तांबे याच मतदार संघाचे तीन वेळा आमदार होते. आ सत्यजीत यांच्या मातोश्री सौं दुर्गाबाई तांबे या संगमनेर शहरांच्या नगराध्यक्ष होत्या. मा सुधीर तांबे यांचे सासरे आणि सत्यजीत यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील खूप मोठे सहकार सम्राट होते. प्रखर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी समाज सेवक होते. सत्यजीत यांचे मामा मा बाळासाहेब थोरात हे सध्या कॉंग्रेस पक्षातील खूप मोठे नेते आहेत. त्यामुळे सत्यजीत यांना बाळपना पासून राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले. या साऱ्या पार्श्वभूमी वर त्यांनी लौकिकांला साजेल असा विजय मिळविला. *जो जिता वही सिकंदरं त्याबद्दल सत्यजीत तांबे या तरुण आमदाराचे हार्दिक अभिनंदन! 💐🤝*
       *आमदार साहेब तुमचा मतदार संघ जामखेड पासून थेट सातपुड्यातील धडगाव पर्यंत एव्हडा विशाल आहें तेव्हड लक्षात असू द्या साहेब!*
          या निवडणूकीने सर्वं महाराष्ट्र राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. एका बलाढ्य राजघराण्यासी एका सामान्य स्त्रीनें टक्कर घेतली. तरी हीं लढत प्रतिस्पर्धी तांबेना घाम फोडणारी होती. शुभांगी पाटील या उच्चं शिक्षित उच्चं मध्यम वर्गीय कुटुंबातील तरुणी आहेत. त्या एम एड, एल एल बी शिकल्या आहेत. त्यांना कौटुंबिक अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांनी आपल्या वैक्तिक नेतृत्व गुणावर खूप मोठा लोकसंग्रह तयार केला आहें.
      त्या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसियशनच्या राज्याध्यक्ष, पाटील महाराष्ट्र स्टुडंट्स असोशियशनच्या अध्यक्ष, पाटील महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरोमेडिकल एम्पलाईज असोसियशनच्या प्रमुख सल्लागार, मोलगी ग्राम विकास मंडळाच्या सचिव, धुळ्यातील एज्यूकेशन सोसायटी आणि जळगावातील गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अशी विविध पद त्या भूषवीत आहेत.
           शुभांगी पाटील यांची राजकारणात बाप कमाई काहीच नसली तरी आप कमाई खूप आहें. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहें.
         तशा त्या मूळ राष्ट्रवादीच्या होत्या. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिक पदवीधर मतदार संघ लढवायचा विचार डोळ्यांसमोर ठेवत त्यांनी अनेक वर्षा पासून काम सुरु केले होते. त्यांनी या मतदार संघात बरीच मशागत केली आहें. पण यांवेळी नाशिक पदवीधरं मतदार संघात निवडणुकीत बऱ्याच गनिमी कावे, शह काट शह करत, पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत अंतिम क्षणी कोणत्याही पक्षाचा उमेदवार रिंगणात उतला नाहीं. सर्वं उमेदवार अपक्षच होते. त्यात शिवसेनेने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली म्हणून मग त्या मविका आघाडीच्या उमेदवार ठरल्या. तर सत्यजीत तांबे हे अपक्षच राहिले आणि त्यानी अनेक पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळविला. निवडणूक अत्यंत चुरशीची झाली, पण प्रत्येक फेरीत तांबे यांचं मतांधिक्य वाढत गेलं आणि शेवटच्या फेरी नंतर तांबे 29,465 मतांच्या फरकाने निवडून आले.
         पण शुभांगी ताई  पराभूत झाल्या असल्या तरी त्या ज्या जिद्दीने लढल्या त्या जिद्दीला सलाम. अशा प्रकारे पराभूत झालेल्याना *बाजीगर* म्हणतात. ताई अभिनंदन!
*कन्या व्हावी अष्टभुजा तिच्या तिन्ही लोकी ध्वजा|*
*ताई खान्देशला तुमचा गर्व वाटतो!*
            दोघांना मिळालेली मत.         
 *सत्यजित सुधीर तांबे* : 68,999
 *शुभांगी भास्कर पाटील* 39,534
          अहमदनगर जिल्हा हा तसा प महाराष्ट्राचा भाग आहें. केवळ राजकीय सोईसाठी त्याला खान्देशला जोडण्यात आले आहें. प महाराट्रातील नेते किती आक्रमक जिद्दी असतात तें मी सांगण्याची गरज नाहीं. तसेच हीं जनता आणि नेते राजकीय दृष्ट्या हीं खूप जागृत असतात. 
           त्या मानाने खान्देशी नेते आणि जनता किती कचखाऊ आहें हेही सर्वांनां माहीत आहें. राजकीय जागृती आणि जिद्द एकदम शून्य. पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणीचे आकडे सांगतो बघा,
जिल्हा         लोकसंख्या       पदवीधर    गुणोत्तर 
1 अ नगर    45,43,159     1,15,638    2.55%
2 नाशिक    61,09,052        69,652     1.14%
3 धूळे         20,48,781        23,412     1.14%
4 जळगाव   42,24,442       35,058      0.83 
5 नंदुरबार    13,09,135      18,971       1.45
            बघा किती निरुत्साही,  आळसी आणि उदास लोक लोक आहेत आपलें. अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या केवळ 45 लाख 43 हजार 159 आणि त्यांनी पदवीधर मतदार नोंदविले 1,15,638 आणि नाशिक, धूळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्याची लोकसंख्या 1 कोटी 36 लाख 91 हजार 410 म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या तीन पट आणि मतदार नोंदणी किती तर 1,47093 म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पदवीधरा एवढी. किती लाजीरवाणी गोष्ट आहें! *कसं मीळेल खान्देशला मुख्यमंत्रीपद, कशी बांधली जातील धरण, कसं मीळेल प्यायला शेतीला पाणी, कशी येईल भांडवली गुंतवणूक, कसा तयार मीळेल रोजगार?*
         आरे आसाकसा मरेल मायन दूध पेयल सेत रे तुम्ही? कवय जाग यी तुमले? बठ उलगी जाई त्यारोज कां रे?
*खान्देशकी सोच पगले मुशीबत आनेवाली है,*
*तेरी बरबादीके मशवरे है जहाँमे!*
*नां समझोगे तो मीट जावोगे खान्देशीयो,*
*तुम्हारी दास्ता तक नही होगी दास्तानोमे!*
        जाऊ द्या बोली बोली मी बी थकी चालनू. जाता जाता कोनी तरी मना एक निरोप शुभांगीताई लोंग पोसाडा,
*हवामे ताशकां महेल नही बनता,*
*रोनेसे मुकद्दर नही सुधरता,*
*जितनेका होसला रख्खो ताई,*
*एक हारसे कोई फकीर,*
*और एक जितसे कोई सिकंदर नही होता!*
शुभांगी ताई आगे बढो!✊🏻👊🏻
🎓👑🙏🏻👑🎓 बापू हटकर
🎓👑🎓👑🎓👑🎓👑🎓👑🎓👑🎓
ता क - माझे माननीय वंदनीय खान्देशी वांगमय चोर बांधवाना विनंती आहें की, नेहमी प्रमाणे लेखा खालील माझे नावं कट करून तुमचं नावं टाकून प्रसिद्धी मिळवून घ्या. किंवा लेखाचं क्रेडिट मला मिळू नये म्हणून निनावी लेख फॉरवर्ड करत आसुरी आनंद लुटा. जय दरोडेखोरी जय भामटेगिरी!😸😻

Post a Comment

0 Comments