शिंदखेडा( यादवराव सावंत) प्रतिनिधी-- येथील नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आयोजित विद्यमान नगराध्यक्षा सह नगरसेवकांचा कार्यकाल एकतीस जानेवारी ला संपणार असल्याने एक फेब्रुवारी पासून नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त होईल परंतु अद्यापतरी कोणाला प्रशासक म्हणून नियुक्ती पत्र प्राप्त नसले तरी ही माळ मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्या गळ्यात पडणार असे गोपणीय चर्चा सुरू आहे. शिंदखेडा नगरपंचायत वतीने हा शहरात नव्हे तर जिल्ह्यात अनोखा निरोप सहह्दय सत्कार सोहळा सर्व सत्ताधारी व विरोधी पक्षांना सोबत घेऊन आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे यांनी प्रतिमेचे पूजन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ह्यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश नागो देसले, भिला बारकु पाटील, गटनेते अनिल वानखेडे, निर्मला युवराज माळी, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, वंदना चेतन परमार, वैशाली विनोद पाटील, भारती जितेंद्र जाधव, संगीता चंद्रकांत सोनवणे, संगीता किरण थोरात, फतीमाबी कुरेशी, किसन जगन सकट, उदय देसले, दिपक अहिरे, स्विकृत नगरसेवक अरुण भिकनराव देसले, अशोक बोरसे यांच्या सह मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, वामन अहिरे, आदी उपस्थित होते. सहह्दय निरोप सत्कार मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी नगराध्यक्षा सह उपनगराध्यक्ष, विविध विभागाचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांचा केला. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेला दिलेल्या सेवेबद्दल सौ रजनीताई वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, अँड.विनोद पाटील, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, दिपक अहिरे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, प्रल्हाद देवरे, विवेक डांगरीकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रल्हाद देवरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे यांनी मला शहराने लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून दिलेली जबाबदारी सांभाळत असताना सर्व माझे नगरसेवक सहकारी आणि नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले म्हणून आभार मानले. विविध विकासकामांसाठी माजी मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल, नेते कामराज निकम, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी शहराच्या विकासासाठी नेहमी साथ दिली म्हणून कोराणा काळ वगळता इतर वर्षात भरीव कामे करीत असतांनाच शहरातील पाणी पुरवठा योजना, भुमिगत गटारी, अंतर्गत रस्ते, ओपन प्लेस व सुंदर शहर, स्वच्छ शहर निर्माण करण्यासाठी मोलाची भूमिका सर्वच नगरसेवक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावली तरच विकासकामे मार्गी लागली असे गटनेते अनिल वानखेडे यांनी सांगितले.
0 Comments