Header Ads Widget

गंगापुरी येथे आमदार अनिल पाटील व जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन

अमळनेर(प्रतिनिधी)
तालुक्यातील गंगापुरी येथे आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून अंदाजित ७ लक्ष किंमतीच्या  सभामंडपाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन  आमदारांनी ग्रामस्थांना दिले.
    यावेळी जि.प.सदस्या जयश्री पाटील,पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील,विनोद जाधव,निवृत्ती बागुल,एल.टी.पाटील,माजी नगरसेवक विनोद कदम,दीपक पाटील,समाधान धनगर निंभोरा आदी मान्यवर उपस्थित होते.तर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच अश्विनी पाटील,सदस्य भरत पवार, नितीन पवार, बालू मोरे, ग्रामसेवक दिगंबर सैंदाणे, रवींद्र पाटील पोलीस पाटील,नीलकंठ पाटील, रघुनाथ कोळी,दिलीप पवार,लक्ष्मण कुमावत, मिलिंद पवार,भगवान पाटील, विनायक पाटील,भाईदास कोळी, भास्कर कोळी, लटकन शिरसाठ, खापरखेडा येथील पिंटू पाटील, रोहन पावर, मुरलीधर पाटील, व मुंगसे सरपंच प्रकाश कोळी, मठगव्हाण येथील तारखेश्वर गांगुर्डे, राजेश पाटील, प्रशांत कोळी, भटू कोळी व गंगापूरी ग्रामस्थ हजर होत.

Post a Comment

0 Comments