Header Ads Widget

⭕उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिरास प्रतिसाद ⭕शेकडो रुग्णांनी घेतला लाभ,गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया-आ.अनिल पाटील

अमळनेर- राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अमळनेर ग्रामिण रुग्णालयात आयोजित भव्य आरोग्य शिबिरास रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभला. 
     
  आ.अनिल पाटील,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सौ तिलोत्तमा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चव्हाण, माजी नगराध्यक्ष विनोदभैया पाटील, सर्व लायन्स पदाधिकारी आणि तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी आ.अनिल पाटील यांनी दीड वर्षांपासून कोविड युक्त असणारे ग्रामिण रुग्णालय आता कोविडमुक्त असल्यामुळेच इतर आजारांचे शिबीर आम्हाला घेता आले असून याठिकाणी रुग्णांची तपासणी होऊन योग्य तो वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे,ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल त्यांच्यावर महात्मा फुले आरोग्य योजना अथवा कोणत्याही योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे त्यांनी सांगून शिबिरात सेवा देणारे सर्व डॉक्टर आणि रुग्णांना अल्पोहाराची सोय करून देणारे लायन्स क्लब आणि सर्व आरोग्य टीम व ग्रामीण रुग्णालयाचे विशेष आभार व्यक्त केले.यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,संचालक योगेश मुंदडा,नीरज अग्रवाल, लायन्स क्लब अध्यक्ष विनोद अग्रवाल, सचिव योगेश मुंदडा, खजिनदार प्रसन्ना जैन,लिओ चेअरमन डॉ मिलिंद नवसारीकर,प्रदीप जैन,ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश ताडे,वैद्यकीय अधिकारी डॉ जी एम पाटील,न प रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन,राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, बाळासाहेब कदम,महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील महिला शहराध्यक्ष आशा चावरीया, संजय पुनाजी माजी पं.स.सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, डॉक्टर सेल शहराध्यक्ष हेमंत कदम, शिवाजी आनंदराव पाटील, देविदास देसले,युवक चे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, युवक तालुका अध्यक्ष विनोद सोनवणे, शहराध्यक्ष निलेश देशमुख, रफिक मिस्तरी, मुशीर शेख, अबीद अली सय्यद अली, लतिफ मिस्तरी, कल्पेश गुजराथी, गजानन पाटील, गणेश पाटील, पप्पू कलोसे, नगरसेवक दिपक पाटील, उमेश सोनार, शुभम पाटील, यतीन पवार, निनाद शिसोदे, गोविंदा बाविस्कर, कुणाल पवार, भूषण भदाने, सुनील शिंपी, प्रदीप पाटील, श्रीनाथ पाटील, शुभम बोरसे, अमोल पाटील, बाळू पाटील उपस्थित होते.

या तज्ज्ञ डॉक्टरांनी केली रुग्ण तपासणी

          सदर शिबिरात जळगावचे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ निलेश चांडक, नेत्र शल्यचिकित्सक-डॉ.यु.बी.तासखेडेकर, डॉ.प्रविण पाटील.
दंत रोग तज्ज्ञ- डॉ.सुमित पाटील,त्वचारोग तज्ञ- डॉ.सुनिल बन्सी,स्त्री रोग तज्ञ- डॉ.श्रध्दा चांडक, डॉ.भूषण पाटील.
फिजीशीयन तथा हृदयरोग तज्ञ, मधुमेह- डॉ.संदिप जोशी, डॉ.विक्रांत पाटील,जनरल सर्जन- डॉ.सुशांत सुपे,अस्थिरोग तज्ञ- डॉ.विजय कुरकुरे,डॉ.सचिन अहिरे,बालरोग तज्ञ- डॉ.जी.एम.पाटील, डॉ.आशिष पाटील,आयुष विभाग- डॉ.परेश पवार, डॉ.शिरीन बागवान,
क्ष किरण तज्ञ- डॉ.प्रियंका पाटील,कान नाक घास- डॉ.नितीन विसपुते यांनी तपासणी केली.शिबिर यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे,डॉ जी एम पाटील, डॉ. आशिष पाटील, श्रीमती वळवी सिस्टर, श्रीमती महिरास सिस्टर, लिपिक अजय पवार यांच्या सह सर्व नर्सिंग स्टाफ, कक्ष सेवक, स्वच्छता सेवक, सुरक्षा रक्षक आदींचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments