Header Ads Widget

धुळे महानगरपालिका अधिकार्‍यांची कर्तव्यतत्परता सप्तश्रृंगी मंदिराजवळील धोकादायक खड्डा बुजविला



धुळे-येथील साक्री रोडवरील मलेरिया ऑफीसमागे सप्तश्रृंगी माता मंदीरासमोर  व्हॉल्व नादुरुस्तीमुळे खोदुन ठेवलेला खड्डा व त्यामुळे संभाव्य धोका या संदर्भात समाजमाध्यम व वृत्तपत्रातून ‘पालिकेच्या अधिकार्‍यांचे’ ‘चिलम तमाकू वो घरकू’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. 


 महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष सचिव मनोज वाघ यांचा संदेश आला त्यात म्हटले होते की, “संबंधित खड्ड्याबाबत त्वरीत कार्यवाही होईल’’ त्याप्रमाणे तातडीने कार्यवाही होऊन पाणी पुरवठा विभागाकडून कायमस्वरुपी त्वरीत व्हाल्व दुरुस्ती करून खड्डा बुजविण्यात आला व पाण्याची नासाडी थांबली आणि संभाव्य धोका टळला तसेच त्याच वृत्तात नमूद केलेल्या तक्रारी विषयी मोबाईल कंपनीचे  जेथे खांब खोदून झाले त्या खांबाजवळील मलेरिया ऑफीसजवळ पडून असलेल्या उर्वरीत मातीचे ढीग उचलण्यात आले व पालिकेचे आरोग्य निरीक्षक  रुपेश पवार, मुकादम संदीप  वाघ यांनी तातडीने दखल घेऊन स्वच्छता निर्मूलन केले. समाजमाध्यम व वृत्तपत्रातील वृत्ताची दखल घेतल्याबद्दल मलेरिया ऑफीस व सप्तश्रृंगी मंदीर परिसरातील नागरीकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांचे आभार मानले आहेत. 
- गो. पि. लांडगे, ज्येष्ठ साथी, राष्ट्र सेवा दल, धुळे. 


Post a Comment

0 Comments