Header Ads Widget

*75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय अपराध भ्रष्टाचार विरोधी मोर्च्याचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा करणी सेना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ठा.श्री. दिनेश भाऊ जाधव यांच्या हस्ते धमाणे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य श्री. भगवंतराव वामनराव सोनवणे उर्फ आबा मुंडे यांना करोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.*




*गावाला लाभलेला सच्चा जनसेवक* 
         धमाणे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य श्री. भगवंतराव वामनराव सोनवणे उर्फ आबा मुंडे या टोपननावानेच जिल्हाभरात परिचित असलेले आबा यांनी मागील दिड वर्षांपासून कोसळलेल्या कोरोना महामारीच्या संकटात हतबल आणि बेरोजगार झालेल्या धमाणे गावातील जवळपास 300 दैनंदिन हातमजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना स्वखर्चाने गहू, तांदूळ आणि बाजरी या स्वरुपात जवळपास 30 क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणावर धान्य वाटप तसेच किराणा किटचे वाटप केले, गावातील गावकऱ्यांचे आरोग्य सुरळीत रहावे याकरीता मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले, कोरोना लॉकडाऊनमुळे न्हावी समाजातील लोकांची पारंपारीक व्यवसायांची दुकाने बंद होऊन त्यांच्या व्यवसायावर आणि परिवारावर लॉकडाऊनचा परिणाम होऊ नये आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी समाजातील सर्वांना धान्य आणि जिवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले. काँग्रेसचे नेते शाम दादा सनेर यांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाला सॅनिटायझर आणि सॅनिटायझर पंप तसेच ग्राम पंचायतीसाठी 25 लीटर सॅनिटायझरचे वाटप तसेच स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या जयंतीनिमित्त किराणा किटचे वाटप केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदिप दादा बेडसे यांच्याद्वारे धमाणे गावातील जनतेच्या आरोग्यासाठी वाफ घेण्याचे स्टीमर मशीन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे आणि धमाणे गटाच्या सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या मदतीने धमाणे गावातील विधवा महिलांना किराणा किटचे वाटप केले. कोरोनाच्या सुरुवातीला जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे यांच्या केशरानंद उद्योगसमूहातर्फे गावात मास्क वाटप केले. यावरून गावाच्या हितासाठी जिल्हाभरातील नेत्यांकडून देखील वेळोवेळी मदत मिळवण्याचे कार्य आबांनी आजपर्यंत केले आहे. जीव घेणाऱ्या कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धमाणे गावातील जनतेला वाऱ्यावर न सोडता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनतेच्या मदतीसाठी झटत राहिलेला जनसेवक म्हणजे आबा मुंडे. यादरम्यान कोरोना काळात गावासाठी व जनतेसाठी कार्य करीत असतांना आबांना देखील कोरोनाची लागण झाली. परंतु म्हणतात ना 'देव तारी त्यासी कोण मारी' याप्रमाणे आबांनी योग्य उपचार आणि प्रबळ इच्छाशक्तीद्वारे कोरोना आजारावर मात करीत सुखरूप घरी परतले. गेल्या काही कालावधीत आबांच्या मातोश्री आणि चालू महिन्यात मोठे बंधू यांचे निधन होऊन दुःखाचा डोंगर कोसळलेला असतांनाही दुःखातून सावरत, स्वतःला आणि परिवाराला धीर देत आजही आबा भक्कमपणे गावासोबत उभे आहेत. 
*आपल्या लोकांसाठी केली त्याने जीवाची बी होळी*
*लोकं पुढे जाई सुख-समृद्धी येई*
*तिच हो त्याची दिवाळी, ना तरी हा थांबला*
*गडी एकटा निघाला..*
कोणताही राजकीय वारसा नसतांना व आर्थिक परिस्थिती नसतांना देखील फक्त आपल्या समाजकार्याच्या जोरावर आणि धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या जोरावर आजपर्यंत आबांना जनता मागील तीन ग्रामपंचायत निवडणूकीत प्रचंड मताधिक्याने निवडून देत आहे. यावरून आबांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात येते. याआधीदेखील टायगर गृप महाराष्ट्र राज्य तसेच बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटीत कामगार संघ या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी आबांचे कोरोना काळातील योगदान बघून आबांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले होते.
*#जनसेवक_आबामुंडे #धमाणे*
*#स्व विलासराव देशमुख प्रतिष्ठाण, धमाणे*

शब्दांकन ✒️
*नितिन सोनवणे-पाटील*

Post a Comment

0 Comments