*जनमत-*
*दोंडाईचा-* येथे सालाबादप्रमाणे कानबाई मातेचा उत्सव भक्तांनी मोठ्या जोरा-शोरात साजरा केला. त्यामुळे गावात एकंदरीत चैतन्याचे वातावरण होते. त्यात सर्व भाविकांनी कानबाई मातेकडे लोकांचे सुदृढ आरोग्य व जोरदार वरूण राजाची मागणी केली. यावेळी कानबाई मातेच्या भक्तांसाठी गाव दरवाज्यात नेहमीप्रमाणे प्रसाद व कुत्रीम पाणी फवाऱ्याची व्यवस्था मुन्ना चौक गणेश मित्रमंडळ व राजा हलवाई ग्रुपकडून करण्यात आली होती.
शहरात करोना व डेल्टा पल्स आजाराच्या पाश्वभुमीवर भाविकांनी सरकारी नियम पाळत. दिनांक १५ आँगस्ट रविवार रोजी घरीच कानबाई मातेचे स्थापना केली. तसेच यावर्षी कोणतेही जवळ व लांबचे आप्तस्वकीयांना न बोलवता. जे नातेवाईक गावात आहे. त्यांनाच आमत्रंण देत. एक दिवशीय कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्ष उल्हासात सालाबादप्रमाणे जोरात साजरा केला.
आज दिनांक १६ आँगस्ट सोमवार रोजी सकाळपासुन कानबाई मातेच्या विसर्जनाची लगबग भाविकांची सुरू होती.जवळपास सर्वच कानबाई मातेला जुन्या गाव दरवाज्यातून घेऊन जाण्याची प्रथा आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस बंदोबस्तात नियोजन करण्यात येते.ह्यावर्षी नेहमीप्रमाणे गाव दरवाज्यात मुन्ना चौक मित्रमंडळ व राजा हलवाई ग्रुपकडून भाविकांना प्रसादाची व कुत्रिम पाणी फवारणीसाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी मुन्ना चौक मित्रमंडळ व राजा हलवाई ग्रुपचे मयुर कोळी,स्वप्नील भावसार, संदीप मराठे, अतुल सोनवणे,प्रतीक मोरे,कुष्णाल कोळी,गौरव मोहीते,केतन गिरासे,रोहीत गिरासे,डॉ.भुषण चौधरी, टिनू भांडारकर, सागर तोडकर, रोहीत ठाकूर, शाम मराठे, धंनजय पवार आदींनी परिश्रम घेतले.

0 Comments