दोंडाईचा : शहरातील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश
स्कूल व श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती प्री- प्रायमरी रोटरी इंग्लिश
स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त 'भारतीय म्हणून
माझी जबाबदारी', 'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे रियल हिरोज्', भारतीय
स्वातंत्र्य लढा', 'मी तिरंगा बोलतोय', 'ध्वजारोहण कार्यक्रम', 'भारतीय
ध्वज', 'भारतीय ऐतिहासिक वास्तू' या विषयावर घेण्यात आलेल्या
ऑनलाईन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. प्री-प्रायमरी रोटरी
स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत ख्याती चौधरी प्रथम, प्रज्ञा
गिरासे द्वितीय, कुलदीप अडगाळे तृतीय. भाषण स्पर्धेत निहारिका कागणे
प्रथम, गायत्री परमार द्वितीय, स्वरांजली बेहेरे व हिमांशू बागल तृतीय
तर पालकांच्या कार्ड मेकिंग स्पर्धेत पूनम वाडिले प्रथम, शाहीन रजा
द्वितीय, प्रीती कागणे व उज्वला भावसार यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी स्कूलच्या भाषण स्पर्धेत प्राची गिरासे
प्रथम, गायत्री रावळे द्वितीय, श्रेया माळी तृतीय, निबंध स्पर्धेत मिहिका
राजपूत प्रथम, झैनब मिा द्वितीय, विरती जैन तृतीय. चित्रकला स्पर्धेत
दिव्यानी गुरव प्रथम, मित जैन व्दितीय, गायन स्पर्धेत श्रद्धा ठाकरे प्रथम,
स्वराज्ञा लहासे द्वितीय, प्राप्ती जोगे हिने तृतीय क्रमांक मिळवला. महिला
पालकांच्या रांगोळी स्पर्धेत पूजा भावसार प्रथम, ज्योती राजानी द्वितीय,
कविता जमादार व दीपमाला ठाकूर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजयी
विद्यार्थी व पालकांचे शाळेचे अध्यक्ष हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ.मुकुंद
सोहोनी, डॉ.राजेश टोणगांवकर, संचालक मंडळ, प्राचार्य एम.पी. पवार
यांनी कौतूक केले.
0 Comments