Header Ads Widget

दोंडाईचा रोटरी पतसंस्थेला राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार



दोंडाईचा : येथील रोटरी नागरी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने हा पुरस्कार
देण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते रोटरी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश कवाड यांनी शिर्डी येथील सहकार प्रशिक्षण व संशोधन
मंदिरात सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. नाशिक विभागातून तृतीय क्रमांकाचे
पारितोषिक रोटरी पतसंस्थेला प्राप्त झाला आहे.
याप्रसंगी रोटरीचे चेअरमन सुरेश जवरीलाल जैन, संचालक संजय छाजेड, रमेश जैन, प्रदीप
पारख, ईश्वरलाल भावसार, पतसंस्थेचे सचिव नारायण शर्मा आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments