Header Ads Widget

धुळे : मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमप्रसंगी दोन शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न

धुळे : मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमप्रसंगी दोन शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सतर्क पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ रोखल्याने सदर अनर्थ टळला. (Dhule-news-two-farmer-atempt-suicide-independance-day-dhule-collector-office)

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमदरम्यान त्याठिकाणी दोन शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी होणारा अनुचित प्रकार टळला असून या दोन्ही शेतकऱ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेले ज्वलनशील द्रव्य देखील पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आत्मदहन कर्त्या शेतकऱ्यांना घटनास्थळावरुन शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

शहादु निवृत्त तांबे या शेतकऱ्याची शिंदखेडा तालुक्यातील आरावे या शिवारामध्ये साडेचार एकर शेती असून त्या ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्याच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराने शेतातील सर्व माती खरडून वाहून नेली. या कारणाने संबंधित कंत्राट दारावर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी संबंधित शेतकऱ्याने वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले. परंतु प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची दखल या प्रकरणांमध्ये घेण्यात आली नसल्याने अखेर निराश होऊन संबंधित शेतकऱ्याने आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रसंगी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.

Post a Comment

0 Comments