Header Ads Widget

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा आदेश पारित*, 🔰🔰 👉🏼 *जुलै २०२१ पासून थकबाकी मिळणार*. 💠💠 *संघटनेच्या आंदोलनाला यश* 💠💠

🔰🔰 *
          राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुमारे ६७ हजार आशा स्वयंसेविका आणि ४ हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत.आशा स्वयंसेविका गावपातळीवर आरोग्याशी संबंधित सुमारे ७८ प्रकारची कामे करतात. त्यांना प्रत्येक कामाचा वेगवेगळा  मोबदला  मिळतो तर गटप्रवर्तकांना दरमहा १० हजार रुपये प्रवासभत्ता दिला जातो.
            आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिला जाणाऱ्या मोबदल्यात आणि प्रवासभत्यात वाढ करावी तसेच त्यांना दरमहा ठराविक पगार देऊन शासकीय सेवेत सामावून घ्यावे. यासाठी संघटनेच्या अध्यक्ष मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली  आशा स्वयंसेविकांनी माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेच्या काळात बहिष्कार आंदोलन तसेच जुलै महिन्यात काळ्याफिती लावून निषेध आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर *राज्याचे आरोग्य मंत्री मा. श्री राजेशजी टोपे यांनी मानधन वाढीबाबत मायाताई परमेश्वर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती.* 
           परिणामी शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात *जुलै २०२१ पासून १०००/- आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात १२००/- रुपये* तसेच कोरोना महामारी असेपर्यंत प्रत्येकी *५००/-* रुपये  दरमहा वाढ करण्याचे जुलै महिन्यात जाहीर केले होते. त्यानुसार दि.२६ ऑगस्ट २०२१ रोजी सदर मानधनवाढीला मंत्रीमंडळाने मंंजूरी देऊन सुमारे *१३५.६० कोटी* रुपयांची वार्षिक तरतूद केली असल्याचा शासकीय आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव श्री. वि. ल. लहाने यांच्या सहीने दि. ०९ सप्टेंबर रोजी काढला आहे.
              आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना *जुलै २०२१ पासून मानधनवाढीची थकबाकी मिळणार* असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेने शासनाचे आभार मानले आहेत. 

 💐💐 *आपले नेतृत्व* 💐💐

*मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाने, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाने, सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते...* 

💐💐💐💐💐💐💐

Post a Comment

0 Comments