Header Ads Widget

*चाहूल नगरपालीका निवडणुकीची व खेळ सुरू झाला अब्रू हरणाचा...*



*राजकारण करतांना कुटुंब, परिवाराचे वस्रहरण करणे कितपत योग्य...*

*छे-छे,तुमच्या खोटया लोकसेवारुपी प्रेमावर...*

*जनमत-*

*दोंडाईचा-* सुशिक्षित, सज्ञानी,चांगला माणूस कधीच राजकारणात पडत नाही, असे अनेकजण,जाणकार नेहमी आपल्या अनुभव, वैचारिक बोलीतुन सांगत असतात, आणि तो चुकून किंवा जाणूनबुजून वेगवेगळ्या कारणासाठी राजकारणात पडलाच तर, कधी त्याचे परिवार, कुटुंब, चारित्राचे-अब्रूचे वस्रहरण होईल हे सांगता येत नाही.थोडक्यात अशी भविष्यवाणी राजकीय पटलावर ठरलेली आहे. म्हणून थोड्या वेळसाठी जनतेला हा विषय ठिक वाटतो.पण  रोज उठून एखाद्याने पारिवारिक शितोंळे उडवायचा विषय लावला तर समाज अशा राजकारणाला व राजकीय व्यक्तीला कंटाळून जाते.शेवटी माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. रोज उठून विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या विभित्स बातम्या, शब्दांची चिड येते, व अशीच काही परिस्थिती दोंडाईचाकर नागरिक, शहरात मागील पंधरा ते  वीस दिवसापांसुन "चाहूल नगरपालीका निवडणुकीची व खेळ सुरू झाला अब्रू हरणाचा"  असे म्हणत आहे व वैतागून बरीच चाणाक्ष मंडळी राजकारण करतांना कुटुंब, परिवाराचे अब्रूहरण करणे,व करू देणे कितपत योग्य, म्हणून छे-छे म्हणत,थु-थू तुमच्या खोटया, दिखावू लोकसेवारूपी प्रेमावर,असे दैनंदिन वर्तमानपत्र व सोशल मीडिया गरम करून टाकणाऱ्या वायफळ परिस्थितीवर लोक हताश होवून, कोणीतरी यांना आता थांबवा असे म्हणत शासनाकडे गुहार लावत आहे.

राजकारण व राजकारणी व्यक्ती म्हटला तर, तो कधीच सत्य बोलणारा,स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ जनपयोगी कामे करणारा,स्वच्छ मनाने आलेल्या तक्रारी, कार्यकर्त्याच्या हाताला वेळेवर न्याय देणारा सापडणार नाही.( येथे आम्हाला सर्वाच्या बाबतीत म्हणायचे नाही, अनेकजण अपवाद निघू शकतात..) जोपर्यंत तो झोलझाल,व कार्यकर्त्यांसह कोणत्याही गोष्टीला गोलगोल फिरवणार नाही .तोपर्यंत त्याला कोणी नेता म्हणणार नाही, हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असते.म्हणून ते म्हणतात ना-नेत्याच्या पुढे व ना- घोड्याचे मागे कधीही डोळे बंद करून अति अंधविश्वासाने चालू नये.शेवटी स्वतः चेही आयुष्य खराब होते व कुटुंब,परिवार पण देशोधडीला लागते. कारण कोणताही नेता जेव्हा राजकारणात पडतो तर सर्वप्रथम तो स्वतः चे सुरक्षित कवच आमदार, खासदार, नगरसेवक, तत्सम लोकसेवकची पदे मिळवायच्या शोधात असतो.समाजसेवा, लोकपयोगीकामे ,विकासकामे ही तर त्यासोबत आलेल्या जनतेच्या पैशातुन मिळालेल्या निधीतुन करावयाची कामे असतात.त्यात ती कामे कोणकोण किती प्रामाणिकपणे करतो, हा ज्याचा त्याचा "मनचंगा"च काम आहे. म्हणूनच प्रत्येकजण म्हणतो की, हा रोड आताच सहा महिन्यापुर्वी बनवला,व पहिल्याच पाण्यात खड्डा कसा पडला. तर तो खड्डा "कटोरी मे गंगा" राजकारणाचा भाग असतो, हे कालांतराने नागरिक समजून जातात.

अनेकदा जनता मग अशा लोकप्रतिनिधी, जनसेवक,लोकसेवक यांना पाहून  आपल्या खान्देशी आहिरानी बोलीभाषेत म्हणतात की, काही नाही हो, साहेब, आबासाहेब, आण्णासाहेब,नानासाहेब, भाऊसाहेब, बापूसाहेब, दादासाहेब अशी भिद्रावली कमायेल व्यक्ती काही वरीस पहिले पानटपरी, चहानी कँटली,शेतीसाहित्य,भाजीपाला लाँरी, सट्टानी चिठ्ठी, हातगाडीवर कपडा,शिपाई, गुलामी पंसद जिंदगी ,घरगढी, पाणी देवाण काम,गाडी चलावान काम, पंक्चर काढान काम,पीए म्हणी काम करे आणि आते देखा जनता, लोकसनी दिनरात सेवा करी करी कशी गाडी, घोडा , राजपाट,बंगला बांधाई गया यासना. याले म्हणतस खरी समाजसेवा असे उद्गारक शब्द बोलत असतात. कारण हातावर पोट भरणारी कमी शिक्षीत वरील गटातील व्यक्ती जेव्हा सत्ता,पाँवर, पैसा, पद,प्रतिष्ठा, आलिशान लाईफ,व अधिकाऱ्यांना धमकावण्याची धमक व लालसा त्याच्यात जेव्हा निर्माण होते. तेव्हा तो सरळ राजकीय पटलाकडे वळतो. अशावेळेस राजकारणात पडल्यावर समोरची व्यक्ती कशी का असेना,वर्षानुवर्षे निवडून का येत असेना,त्याचे कच्चे चिठ्ठे काढत व वेळप्रसंगी अभद्र शब्द वापरत,त्याचे चरित्र ,कुटूंब व परिवाराचे अब्रूहरण करते,व मागील नेत्याने कसे जनतेला व सरकारला उल्लू बनवून,लुटत करोडोची माया,अलिशान जिंदगी व सत्ता व पाँवरचा माज आणत.जनतेच्या मनात आजपर्यंत दहशत निर्माण करून ठेवली आहे असे सांगतात. यासाठी त्याचे हे साम्राज्य आता आपल्याला मिटवायचे आहे,अशी आशा प्रत्येकात फुलवत. मग तो मतदार जनतेला सुरूवातीला खोट्या, खोट्या गावविकास स्वप्नांची, रोजगाराची, उद्योग धंदे निर्मितीची,चांगले शासन द्यायची भुरळ घालतो. तसेच कालांतराने तो निवडून आल्यावर तोही हीच माया जमवायची कामे करतो. तुरळक गावविकास व शहर विकासाची कामे सोडली तर जास्त प्रगती कमी वेळात यांचीच झालेली लोकांना दिसते. 

मग यांना जनतेची कामे,गाव विकासाची काहीच पडलेली नसते. फक्त न फक्त स्वतः चा, कुटूबांचा विकास कसा करता येईल हाच हेतू यांचा राजकारण करण्याचा असतो. अशावेळेस हे भोळ्याभाबड्या जनतेचा व त्यांच्या भावनेचा फक्त पदे मिळवण्यासाठी वापर करून घेतात. जर यांना स्वप्रगतीचे, कुटुंब प्रगतीचे राजकारण करायचे आहे. तर राजकारण करताना अभद्र शब्द वापरून कुटुंब व परिवाराची ईज्जत चव्हाट्यावर आणून,अब्रूहरण करून काय सिद्ध करायचे आहे. शेवटी दोघेही  त्याच काचेच्या राजकीय, सत्ता, पाँवरच्या घरात राहणार आहे. तसेच राजकारणात आज दुधातला पांढरा शोधणे खुप जिकरीचे काम आहे,हे दोघांनाही माहित आहे.

आज समाजातील सर्वसामान्य माणसाला राजकारणाची काही पडलेली नसते. उलट तो राजकारणी लोकांना पाहिल्यावर पाठीमागे शिव्याच देत असतात.कारण एकमेकांचे वैरी, ऐकमेकांची कुटूबांची अब्रू काढणारे कट्टर विरोधकांना वेळप्रसंगी जनतेने एकाच स्टेज,पक्षात सोबत मिळतेजुळते करून घेताना अनेकवेळा पहात असते.मग हे लोकप्रतिनिधी का म्हणून आपले व आपल्या परिवाराचे उनेदुने काढून,तमाशा करून, अब्रूहरण करून समाजाची सार्वजनिक शांतता का भंग करू इच्छितात. आज दोंडाईचा शहरातही मागील पंधरा वीस दिवसापांसुन एक छोटाश्या पत्रिका- घटनाक्रम वरून ,रोज उठून वर्तमानपत्र, सोशल मीडिया मार्फत वातावरण गरम करून,गावाची सामाजिक शांतता खराब केली जात आहे. म्हणून लोकांनीच आता कीर होऊन शासनाकडेच हे लेटर बाँम्ब,फेक बातम्या थांबवण्याची गुहार लावली आहे. अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालीका निवडणुकी काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.तुर्तास ऐवढेच जनतेला म्हणायचे होते.

Post a Comment

0 Comments