Header Ads Widget

*मेथी परिसरातील फेब्रूवारी मध्ये वादळी पाऊसामुळे झालेले नुकसानाची भरपाई रक्कम शेतकरींना मिळाली पाहिजे- दिपक दादा गिरासे...*



 शिंदखेड़ा तालुका तहसील येथे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दिपक गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठे शेतकरी आंदोलन घेण्यात आले.
माघील फेब्रूवारी महिन्यात झालेल्या वादळी पाऊसामुळे शेतकरिंचे पिकाचे खुप मोठे नुकसान झाले होते त्यात प्रामुख्याने गहुचा सीज़न असल्याने सर्व गहु तयार झालेला असतांना त्यावेळी वादळ व पाऊसाने झोपविला आलेला तोड़ीं घास त्यावेळी सर्वांचा गेला त्यात सर्वच शेतकरिंचे अनेक पिकांचे खुप मोठे नुकसान झाले त्यावेळी नावाला शासकीय पंचनामे झालेत त्यात तलाठी दिपक ईशी व कृषि सहाय्यक संदीप वाघ यांनी प्रत्यक्ष शेतात न जाता एका घरात बसून काही ठराविक शेतकरिंचे नुकसान दाखवून पंचनामे केलित या मुळे खरोखर नुकसान झालेले शेतकरिंचे नावे यादितुन वगळली गेलीत ठराविक लोकांची यादी लावण्यात आली अशा कर्मचारिंना घरचा रस्ता दखविला गेला पाहिजे. 
        अशा तलाठी सारखे व कृषिसहाय्यक सारखे शासकीय प्रतिनिधी बेजबाबदार पणे काम करतात त्यामुळे शेतकरिंचे नुकसान यात झाले त्यांचा जाहिर निषेद आज करण्यात आला जोर जोर जोरात घोषणा देण्यात आल्या त्यात झालेली नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, तलाठी व कृषिसहाय्यक यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे, व मेथी वरझडीसाठी नवींन तलाठी मिळाला पाहिजे अशा अनेक महत्वपूर्ण मागण्या दिपक गिरासे यांच्या कडून केल्या गेल्यात व तहसीलदार सुनील सैंदाने यांना निवेदन देण्यात आले यावेळी गणाचे उमेदवार दिपक दादा गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत मशिन्द्र बापू धनगर, योगेश सोनवणे, जितेंद्र सोनवणे, जगदीश गिरासे, शंकर धनगर, राजाराम माळी, भटु माळी, गणेश गिरासे, तसेच परिसरातील मेथी, वरझडी, साळवे, हातनुर गावांचे शेतकरी यांनी आंदोलनात मोठा संख्येने सहभाग नोंदविला होता.

Post a Comment

0 Comments