Header Ads Widget

शेतकर्यांसाठी नागराज चालणार‌ 4 हजार कि, मी बेंगलोर ते दिल्ली पायी यात्रा सोनगीर येथे दाखल



सोनगीर---बेंगलोर ते दिल्ली पायी यात्रा सोनगीर येथे आगमन. केंद्र सरकारच्या तीन कुषी कायदे विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. नागराज भाऊ आपल्या सोनगीर नगरीत गावात ५ वाजता भेट देणार आहेत. शेतकरी बंधू हाँटेल सुरभी येथे यावे ...विनंती. शेतकरी भारत यात्री नागराजबेंगलोर ते दिल्ली पायी यात्रा सोनगीर येथे
उच्च शिक्षित तरुण निघालाय शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दिल्ली.. आज सोलापूर शहरात आगमन झाले आहे.

दिल्ली चलो घोषणा देत. भारत यात्रा करीत नागराज कलकुटगर बागळकोट. कर्नाटका येथील उच्च शिक्षित तरुण मागील वर्ष भरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी निघाललेत.11 फेब्रुवारी2021 रोजी ही भारत यात्रा मलेमहादेश्वर गाव जिल्हा शामराज नगर येथून सुरू केली आहे . मधल्या काळात दुसऱ्या कोरोना लाटेच्याकाळात कडक प्रतिबंदमुळे 2 महिने ही यात्रा स्थगित केली त्यानंतर 3जुलै 2021 रोजी चित्रदुर्ग येथून ही यात्रा पूर्वरत सुरू करून आज रोजी सोलापूर शहरात त्यांचं आगमन झाले आहे.
मागील वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्यांकडे सरकार नजरअंदाज करत आहेत. लोकांमध्ये गैरसमज तयार करण्याच काम देखील मागील वर्षभरात झालं. इतकं सगळं असताना शेतकरी मागे सरला नाही. त्यांनी ठाण मांडून दिल्लीच्या सीमेवर ऊन, वारा ,पाऊस ,थंडी या नैसर्गिक संकटांना तोंड देत आणि सरकारी यंत्रणाच्या दमनशाही झुगारून हे आंदोलन सुरू ठेवले आहेत.
माझ्यासारख्या तरुणास हे सगळं बघून अस्वस्थ वाटत होतं. मग मी ठरवलं की आपण देशभर यात्रा करत लोकांमध्ये जागृती करत हे दीर्घ काळ सुरू असलेले आंदोलन जिवंत राहिले पाहिजे यासाठी मी निघालो आहे. माझ उद्देश एवढंच की हे शेतकरी हा अन्न दाता आहे तो जगला तर जग जगेल इथली माणस जगातील. हा उद्देश घेऊन जात असताना रस्त्यावर जो भेटेल त्याला माहिती देणे, त्याला समजावणे आणि पुढचं गाव शहर करीत दिल्ली पोहचायचे आणि त्या आंदोलनात सामील होणे.
26 नोव्हेंबर शेतकरी आंदोलनास एक वर्ष पूर्ण होतात त्यादिवशी दिल्ली येथील सिंगु बॉर्डर जिथुन हे आंदोलन सुरू झाले होते. त्याठिकाणी पोहचेन त्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा साक्षिदार होणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. हे आंदोलन एक दिशा आहे जी या देशातल्या जनतेनी यात सामील झाले पाहिजे असं मला वाटतं
अशी भावना नागराज यांनी आज भेटल्यावर व्यक्त केली.
आज ते सकाळी 10 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून त्यांची पुढच्या यात्रेस सुरुवात करतील.

Post a Comment

0 Comments