*नगरपालीका व पोलीस विभागाच्या वरदहस्त व दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना रहदारीस त्रास व वेळप्रसंगी वादविवादाचा प्रंसग...*
*सव्हीस स्टेशनवाल्यांची दादागिरीमुळे रहदारीचे मेन रस्ते बंद,दहा बाय दहाचे दुकान सोडून सार्वजनिक रस्त्यावर कब्जा.....*
*जनमत-*
*दोंडाईचा-* येथे आहिल्याबाई शाँपींगमधील बेकायदेशीर गाड्या धुण्याच्या सव्हीस स्टेशनमुळे घाण पाणी सतत दुकानांच्या आजुबाजुला दिवसभर साचत असुन,त्यामुळे डेंग्यू सदस्य मच्छरांचा वावर वाढत असल्यामुळे दुकानदार व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच गावात जाणारे दोघी मेन रहदारीच्या रस्त्यावर घाण पाणी व वाहने लावल्यामुळे सर्वसामान्य महिला व पुरुष नागरिकांस ह्या सार्वजनिक रस्त्याने ये-जा करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणून वेळप्रसंगी अनेकदा नागरिकांचे ह्या सार्वजनिक रस्त्याने येता-जातांना, मार्गक्रमण करताना अनेकवेळा वादविवाद व मारामारी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. आजही अशाच एका चांगल्या सदग्रुहस्थ असलेल्या व्यक्तीला सार्वजनिक बोळीतुन जाताना घाण पाणी अंगावर उडाल्याने बेकायदेशीर सव्हीस स्टेशनवाल्या सोबत वादविवादास मुकावे लागले व सव्हीस स्टेशनवाल्यांची दादागिरी खपवून घ्यावी लागली. म्हणून आता दोंडाईचा-वरवाडे नगरपालीका व पोलिसांनीच यांची वाढत असलेली दादागिरी मोडीत काढून,व दहा बाय दहाचे दुकान सोडून वापरत असलेल्या सार्वजनिक रस्ता व जागेची वाढीव भाडे घेत कडक कार्यवाही करावी अशी मागणी ह्या रस्त्याने येणार जाणारे व शेजारील दुकानदार करत आहे.
आहिल्याबाई शाँपींगमधील बेकायदेशीर गाडी धुण्याच्या सव्हीस स्टेशनमुळे ह्या ठिकाणी नेहमी घाण पाणी,मातीचे गाळ साचलेले असतात. त्यामुळे ह्याठिकाणी नेहमी गंधगी,आरोग्यास हानीकारक परिस्थिती उद्भवलेली पहावयास मिळते.तसेच हे बेकायदेशीर सव्हीस स्टेशनवाले गावात जाणारा मेन सार्वजनिक रस्ता व काँलनी परिसरातुन गावात आहिल्याबाई शाँपीगमधून जाणाऱ्या सार्वजनिक बोळीत गाड्या धुणे व घाण पाणी ,गाळ जमा करत असल्यामुळे चांगल्या लोकांचा वापर बंद झाला आहे. त्यात कोणी ह्या रस्त्यांचा वापर केला तर त्याला अनेक कसरती कराव्या लागतात. वेळप्रसंगी वादविवाद व मारामारी पण करावी लागते. तरी हे बेकायदेशीर सव्हीस स्टेशन चालवणारे सुधरत नाही. उलट त्यांची दादागिरी वाढत जात आहे. आजही अशाच एक सदग्रुहस्थ रस्त्याने जात असताना, त्याचा अंगावर गाडी धुण्याचे पाणी पडल्याने त्याचा तोल जावून घाण पाण्यात पडला. यावेळी त्याने सार्वजनिक रस्त्यावर गाडी धुणे चुकीचे आहे, असा जाब विचारला असता,उलट अर्धा तास सव्हीस स्टेशनवाल्यांनी त्याच्याजवळ दादागिरी केली व वाढती दादागिरी पाहत त्याने तेथुन काढता पाय घेतला. म्हणून नगरपालीका प्रशासनाने स्वतः च प्रत्यक्ष जागेवर येऊन खरी परिस्थिती पहावी व कायम स्वरूपी कडक कार्यवाही करावी. जर हे बेकायदेशीर सव्हीस स्टेशनवाले दहा बाय दहा व्यापारी गाळ्याचे भाडे नगरपालीकेला देत असतील तर कोणाच्या आशिर्वादाने हे सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक वापरायच्या बोळीत गाड्या धुवून, घाण पाणी,गाळ माती गोळा करून लोकांच्या आरोग्याशी व जाण्या-येणाच्या, रहदारीच्या रस्त्यावर लोकांना वापर करण्यापासुन परावृत्त करून त्रास देत आहे. म्हणून दोंडाईचा-वरवाडे नगरपालीने तातडीने जनतेच्या तक्रारीची दखल घेऊन हे बेकायदेशीर सव्हीस स्टेशन कायमस्वरूपी बंद करावेत व यांना दहा बाय दहाच्या गाळयातच व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. तसेच भविष्यात सार्वजनिक रस्त्यांचे होणारे झीज-पतन, नुकसान थाबंवावे,एवढीच रास्त मागणी नगरपालीकेकडून नागरिक बाळगुण आहेत.


0 Comments