Header Ads Widget

दोंडाईचा*आहिल्याबाई शाँपींगमधील बेकायदेशीर गाड्या धुवायच्या सव्हीस स्टेशनला आरोग्य सभापती प्रतिनिधींची भेट-प्रत्यक्ष पाहणीत सत्य समोर....*






*सार्वजनिक रस्ता, बोळ मोकळे करायला चार दिवस़ांची मुदत...*

*आरोग्य सभापती प्रतिनिधीला सव्हीस स्टेशनवाल्यांचे चिरीमिरीचे उत्तर....*

*जनमत-*

*दोंडाईचा-* इतर दुकानदारांच्या आरोग्यावर उठलेल्या येथील आहिल्याबाई शाँपींगमधील बेकायदेशीर गाड्या धुवायचे सव्हीस स्टेशनला नगरपालीका प्रशासनातील मुख्याधिकारी सोडून आरोग्य सभापती प्रतिनिधी व नगरसेवक यांनी काल दिनांक १६आँक्टोबर शनिवार रोजी भेट दिली व प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत.पंधरा फुट बोळीचा रस्ता व वीस फुट मेन रस्ता चार दिवसापर्यंत मोकळा करायचे आदेश देत. बोळीत व रस्त्यावर साचलेले घाण पाणी,गाळ नगरपालीकेच्या कचरा गाडीमार्फत उचलण्याचे तातडीचे तोंडी आदेश दिले आहेत. म्हणून आता मुख्याधिकारी यांनी स्वतः ह्या बेकायदेशीर सव्हीस स्टेशनवाल्यांकडे लक्ष देवून सार्वजनिक रस्त्यांचे नुकसान करणारे हे चारही बेकायदेशीर गाड्या धुवायचे सव्हीस स्टेशन तातडीने बंद करायला हवे अशी मागणी शाँपींगमधील इतर दुकानदारांमध्ये जोर धरत आहे.

मागील पाच वर्षापुर्वी माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख यांच्या सत्तेच्या काळातही आहिल्याबाई शाँपींगमधील इतर दुकानदारांनी सतत तक्रार अर्ज, प्रत्यक्ष भेटत. ह्या बेकायदेशीर गाड्या धुवायच्या सव्हीस स्टेशनवाल्यांची सत्य परिस्थितीची तक्रार म्हणजे बाराही महिने मोटरसायकल व चार चाकी गाड्या धुवायच्या घाण पाणी व गाळ बोळीत तुंडूब भरत असल्यामुळे डेंग्यू सदुष्य डास व दुर्गंधीने इतर दुकानदारांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रारी देण्यात आल्या होत्या. तेव्हा तत्कालीन मुख्याधिकारी व सत्ताधारी गटाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहुन सदर बेकायदेशीर सव्हीस स्टेशनवाल्यांना रितसर नोटीस क्रमांक १,२,तीन नोटीस देवून बेकायदेशीर सव्हीस स्टेशन बंद करायचे आदेश काढले होते.आजही ह्या नोटीसांची नगरपालीका दप्तरी नोंद असेल.म्हणून आजी मुख्याधिकारी श्री डॉ. प्रवीण निकम यांनीही सदर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत,रितसर मागील नगरपालीकेमार्फत दिलेल्या नोटीसींचा विचार करून व सध्या करोना नंतर आरोग्याबाबत राज्य सरकारने उचलेले कडक पाहून, वरील लोकांच्या आरोग्यास हानीकारक बेकायदेशीर सव्हीस स्टेशन ताबडतोब बंद करावे व भविष्यातील इतर दुकानदारांच्या आरोग्याची काळजी कडक कार्यवाही करून घ्यावी व सार्वजनिक ये-जा करणाऱ्या रस्त्यांचे सुरक्षा करून झीज होण्यापासुन वाचवावे. एवढीच रास्त अपेक्षा नागरिक त्यांच्या खुर्ची पदाकडून ठेवत आहेत.

*आरोग्य सभापती प्रतिनिधी यांना बेकायदेशीर सव्हीस स्टेशनवाल्यांचे चिरीमिरी उत्तर...*

जनमत-च्या बातमीची दखल घेत. आरोग्य सभापती सौ.कल्पना नगराळे यांचे प्रतिनिधी श्री कुष्णाभाऊ नगराळे यांनी आहिल्याबाई शाँपींग येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर कडक शब्दात सार्वजनिक नंदुरबार चौफुली ते शामसुंदरकडे जाणारा रस्ता व पटेल काँलनीकडून आहिल्याबाई मधून विविध शाळा व गावात जाणारा बोळीत रस्ता खोदून, गाडी धुत घाण पाणी व गाळ साचवत. इतर दुकानदारांच्या आरोग्याशी खेळत,बोळीतुन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे हाल करणाऱ्या दोघी मेन रहदारीचे सार्वजनिक रस्ते ताबडतोफ मोकळे करायला सांगितले. तसेच सोमवार-मंगळवार पर्यंत घाण पाणी व गाळ नगरपालीकेच्या गाडीत देण्यास सांगत. लोकांच्या तक्रारी वाढत असल्याने बेकायदेशीर सव्हीस स्टेशन रितसर बंद करायास सांगितले. तेव्हा त्यांना सव्हीस स्टेशन वाल्यांनी आमिष वजा अंचबित करणारे उत्तर दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही सव्हीस स्टेशन वाले अनेक दुकानदारांना फुकटात लाईट,फुकटात पाणी,फुकटात गाड्या धुवून देणे,फुकटात त्यांचे वैयक्तिक कामे करून देणे वेळप्रसंगी महिन्याकाठी आलेल्या लाखो रूपयेंमधुन आर्थिक मदत करणे आदी कामे करतो.म्हणून आपल्याकडे तक्रार आलीच कशी व तक्रार चुकून आली असेल असे न विश्वास बसणारे उत्तर दिले. म्हणजे एकतर हे सार्वजनिक रस्ते व दुकानांपुढे बेकायदेशीर वीस फुटाचे रँम बनवुन कोणाला आणि कोणालातरी वरील सुविधा देत असणार किंवा आलेल्यांना सुविधा पुरवायचा विचार असेल, असेच काहीसे त्यांच्या चिरीमिरीच्या बोलण्यावर लक्षात येते. एंकदरीत बाकी काहीही असो,बेकायदेशीर सार्वजनिक रस्त्यावर गाड्या धुवायच्या सव्हीस स्टेशन मधुन दिवसाकाठी हे लोक तीन-चार हजार व महिन्याकाठी लाखो रुपये कमवत असणार तर हे म्हणजे काय कोणालाही चिरीमिरी शब्द देवून सार्वजनिक रस्ते व दुकानांपुढील सार्वजनिक जागेवर कब्जा करणार का?असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आता नगरपालीका मुख्याधिकारी यांनी सत्य परिस्थिती पाहून ताबडतोब हे पैशाने दादागिरीत रूपांतर झालेले बेकायदेशीर सव्हीस स्टेशन बंद करावे,अशी ह्या रस्त्याने येणार-जाणार व इतर दुकानदारांची भावना झाली आहे.

Post a Comment

0 Comments