Header Ads Widget

बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्रत डॉक्टर , नर्स, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई यांची बैठक, जिप सदस्य ललित वारुडे यांच्या सत्कार



 बेटावद---दिनांक 26 10 2021 रोजी  प्राथमिक आरोग्य केंद्रत बेटावद येथील डॉक्टर , नर्स, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत बेटावद आणि परिसरात वाढत असलेले डेंगूचा आजार, कोविड चे मंदावले लसीकरण,


 लसीकरणाला येत असलेल्या अडचणी, लसीकरणा मध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग, चिकनगुनिया आणि अनेक आजारांच्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अडचणी ,अपुरे मनुष्यबळ लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून येत असलेल्या अडचणी या सर्व विषयावरती चर्चा करण्यात आली लवकरच हे सर्व विषय मार्गी लावून साथीचे आजार थांबून बेटावद जिल्हा परिषद गटातील लोकांना आरोग्याच्या समस्येतून समाधान कसं करता येईल यासंदर्भात कारवाई लवकर करण्यात येईल या प्रकारचा विश्वास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ललित मधुकर वारुडे यांनी दिला ह्या  बैठकीत प्राथमिक केंद्रांच्या आरोग्य अधिकारी यांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ललित मधुकर वारुडे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.


   

Post a Comment

0 Comments