Header Ads Widget

*जायखेडा पोलिसांची अवैधरित्या वाळूतस्करी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई:-*



आज दि ०२/१०/२०२१ रोजी मध्यरात्री ०१.३० वाजेच्या सुमारास ताहाराबाद चौफुली वर इसम नामे किरण खुमण पवार, वय- २३ वर्षे , रा.ताहाराबाद, ता.सटाणा, जि. नाशिक हा इसम त्याचे ताब्यातील विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर व ट्रॉली मधून अवैधरित्या विनापरवाना वाळू या गौणखनिजाची चोरी करून वाहतूक करताना मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक किरण खुमण पवार, वय- २३ वर्षे ,व ट्रॅक्टर मालक हेमंत रामचंद्र साळवे दोघे रा.ताहाराबाद, ता.सटाणा, जि. नाशिक यांचेविरुद्ध जायखेडा पोलीस ठाणे येथे भादवि ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर, ट्रॉली व सुमारे ०१ ब्रास वाळू  असा एकूण ४,७५,००० /-  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
 सदरची कारवाई मा.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.सचिन पाटील, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत खांडवी, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव ग्रामीण श्री.  पुष्कराज सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. श्रीकृष्ण पारधी यांचे आदेशाने ताहाराबाद दुरक्षेत्राचे दुरक्षेत्र अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री.नवनाथ रसाळ, पोलीस हवालदार श्री. गायकवाड, पोलीस हवालदार श्री. ठाकरे, पोलीस शिपाई श्री. सुनीलसिंग बावरी यांचे पथकाने केलेली आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment

0 Comments