Header Ads Widget

शिंदखेडा तहसील कार्यालयसमोर महाराष्ट्रराज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण*



शिंदखेडा(प्रतिनिधी):- येथील तहसील कार्यालय समोर आज महात्मा गांधी जयंती अवचित साधुन संपूर्ण महाराष्ट्र भर ग्रागरोजगार संघटनेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.त्या पाश्वभुमीवर आज शिंदखेडा येथे संघटनेचे






पदाधिकारी यांनी उपोषण केले. यात रोजगार हमी योजनेच्या ग्रामपंचायत अंतर्गत स्तरावर ग्रामसभेतुन ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.त्यानुसार आजतागायत रोजगार सेवकांना प्रशासकीय खर्चाच्या निधीतून सहा टक्के मानधनावर कार्यरत आहेत.गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करीत आहेत.जाणीवपुर्वक अन्याय केला जात आहे. कुटुंबाची जबाबदारी असलेले सेवक काम करत आहेत.अशा रोजगार सेवकांना कायमस्वरुपी सामावून न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने लक्ष केंद्रित करावे न्याय मिळवून देण्यासाठी आज उपोषण करण्यात आले.हयात प्रमुख मागण्यामध्ये ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे व त्याना कर्मचारी दर्जा देण्यात यावा. ग्रामरोजगार सेवकांना कमी करण्यासाठी अधिकार आयुक्त कडे असावा.सेवकाचे मानधन त्यांच्या वैयक्तिक बॅकेच्या खात्यात वर्ग करण्यात यावे. सेवकाना शासननिर्णायाप्रमाणे अल्पोहार व प्रवासभत्ता देण्यात यावा.सेवकाना दरमहा वेतन शासन नियमानुसार मिळावे. थकीत बिल व टी.ए.डी.ए. देण्यात यावा.सदरील मागणी चा सहानुभूती पुर्वक विचार केला जावा.व न्याय मिळवून द्यावा. हयावेळी जिल्हाध्यक्ष समाधान धनगर,तालुका अध्यक्ष प्रदीप बोरसे,तालुका उपाध्यक्ष विनोद संधानशीव,सचिव भिला चव्हाण देवेसिंग गिरासे,किरण पाटील, चंद्रकांत माळी,संदीप निकम, संभाजी पाटील,नगराज देसले, पुना मंगळे,विक्रम पाटील, भास्कर पाटील,प्रमोद मोरे, योगेश बोरसे,विजय कोळी,नरेंद्र पाटील,विजय ईशी,आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments