Header Ads Widget

⭕लेखी आश्वासन दिल्या नुसार बैठक घेऊन निर्णय देण्याची प्रक्रिया सुरू करा अन्यथा संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल! ⭕ मुंबईत ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबांना प्रत्यक्ष निवेदन देऊन सिद्धेश्वर मुंडेंनी दिला इशारा!

लेखी आश्वासन दिल्या नुसार बैठक घेऊन निर्णय देण्याची प्रक्रिया सुरू करा अन्यथा संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल!

मुंबईत ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबांना प्रत्यक्ष निवेदन देऊन सिद्धेश्वर मुंडेंनी दिला इशारा!

राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन सामावून घेण्यात यावे या प्रमुख मागणी साठी 22 फेब्रुवारी ते 11 मार्च 2021 दरम्यान आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्यात आले होते,या आंदोलनाला पोलीस प्रशासना मार्फत दडपण्याचा शासनाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला,आंदोलनावर लाठीचार्ज केला,तरीही आंदोलन सुरूच राहिल्याने राज्य शासनाच्या वतीने ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांनी मागणी मान्य केली व लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन लेखी दिले,त्यानंतर आता पर्यंत अनेक वेळा मुश्रीफ साहेबांची भेट घेऊन त्यांना अनेक वेळा निवेदन दिले की ग्रामपंचायत स्तरावर सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन लागू करण्यासाठी बैठक घेऊन पुढील प्रक्रिया सुरू करावी,त्यावर त्यांनी या महिन्यात बैठक घेऊ,थोड्या दिवसात बैठक घेऊ म्हणाले,एकदा जून महिन्यात तारीख देऊन बैठक रद्द केली व आता पर्यंत बैठक घेतली नाही,मागील महिन्यात त्यांनी एक महिन्यात बैठक घेऊ म्हणून सांगितले,तरीही काहीच हालचाल नसल्याने मुंबईत जाऊन त्यांना भेटून निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले,त्यानुसार काल 9 नोव्हेंबर व आज 10 नोव्हेंबर या दिवशी मुंबईत भेटी साठी आलोत, आज मुंबई येथे त्यांची सकाळी 10 वाजता भेट घेतली व मा.मुश्रीफ साहेबांना निवेदन दिले आणि आपण अनेक वेळा बैठक घेतो म्हणून सांगितले परंतु बैठक घेतली नाही पण यावेळी जर आपण बैठक घेतली नाही तर महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आला.
यावेळी त्यांच्या सोबत चर्चा झाली असून शासन काय निर्णय घेणार त्यानुसार संघटनेच्या वतीने पुढील दिशा ठरवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
संगणकपरिचालक
सिद्धेश्वर मुंडे राकेश देशमुख मयुर                कांबळे
अध्यक्ष             उपाध्यक्ष         सचिव
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटन

Post a Comment

0 Comments