*नगरसेवक रूपचंदाणी यांच्याकडे दोन वर्षात दोन चोऱ्या...*
*पोलीस स्टेशनला तक्रार देता,पाच दिवसांनी तक्रार दाखल करण्याचे दोंडाईचा पोलीसांचे आश्वासन..*
*जनमत-*
*दोंडाईचा-* सिन्धी काँलनी येथील रहिवासी तथा वार्डाचे नगरसेवक श्री गिरधारीलाल नानकराम रूपचंदाणी यांच्याकडे नुकतेच गुरनानक जंयती छटीच्या भंडाऱ्याच्या दिवशी घरापुढे लावलेली हीरो कंपनीची एक लाख रूपये किमंतीची मोटारसायकल चोरीला जाण्याची घटना घडली आहे. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत तक्रारकर्ता श्री रूपचंदाणी यांनी दिलेली माहिती अशी की, मी सिन्धी काँलनी येथील रहिवासी तथा नगरसेवक म्हणून मागील वर्षापासून वार्डाचे काम पाहत आहे. म्हणून दिनांक २५ नोव्हेंबर गुरूवार रोजी गुरूनानक जंयतीच्या छटीनिमित्त घराजवळच स्व:निर्मित केलेल्या बाबा माधवदास दरबार येथे संत्संग व भंडाऱ्याचा कार्यक्रम सर्व समाज बांधवांसाठी आयोजित केला होता. म्हणून रात्री एक वाजेपर्यंत दरबारातून कार्यक्रम आटोपून व थकलेले असल्यामुळे गाडी घरापुढे नेहमीप्रमाणे लावली व सोबत इतरही मोटरसायकली उभ्या होत्या.मात्र सकाळी जसे दुकानावर निघायची वेळ झाली. तेव्हा घरापुढे अंगणात लावलेली एक लाख रूपये किमंतीची हिरो कंपनीची स्पेल्डंर सुपर गाडी दिसुन आली नाही. म्हणून तसेच तातडीने मी स्वतः नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदाणी दोंडाईचा पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जात तक्रार देण्यात आली आहे. मात्र ठाणे अंमलदार श्री माळी यांनी चार-पाच दिवस मोटरसायकल इतरत्र शोधा असे मार्गदर्शन करत,मोटारसायकल सापडली नाही तर पाचव्या दिवशी तक्रार दाखल करून घेवू,असा चांगला सल्ला दिला. माझ्याकडे मागील दोन वर्षात चोरीची ही दुसरी घटना असुन,पहिल्या घटनेत मुकेश आँईल मीलमधुन कैलास ट्रेडर्समधील ष्यानऊ कट्टे चोरीतील तांदुळाचा तपास अजुनपर्यंत लागलेला नसुन,लगेच घरापुढे लावलेली एक लाख रूपये किमंतीची हीरो कंपनीची मोटारसायकल एम.एच.-१८-ए.एच.-४२९९ चोरीला जाणे म्हणजे तपास लागेल की नाही व गुन्हा दाखल केला जाणार की नाही? याबाबत माझ्या मनात अर्थात तक्रारकर्ताच्या मनात सांशकता निर्माण झाली आहे,असे शेवटी त्यांनी बोलताना अधोरेखित केले आहे.

0 Comments