
महाराष्ट्रातील संपूर्ण ग्राम पंचायतीत संगणकीकरण व डिजिटल ग्राम पंचायती करण्यासाठी प्रत्येक गाव खेड्यावर संगणक परिचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सेवेत ग्राम पंचायतीचे लेखे-जोखे,सर्व आज्ञावली,एक ते तेतीस नमुने,विविध दाखले व इतर ऑनलाईन सर्व सेवा संगणक परीचालकांच्या माध्यमातून दिल्या जातात. त्या माध्यमातून सर्व नागरिकांना स्थानिक पातळीवर सर्व सेवा उपलब्ध होत असून ग्राम पंचायती पेपरलेस होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र या सेवेच्या मोबदल्यात संगणक परीचालकाना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असून त्यांना शासन सेवेत व आयटी महामंडळात समाविष्ट करण्याच्या मागणीला शासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, मुंबई येथे कित्येकदा आंदोलने व संप पुकारले मात्र शासनाने फक्त त्यांना आश्वासने देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे कामे केले आहे.त्याकरिता संघटनेच्या माध्यमातून संघटनेत बळकटीकरण करून संगणक परीचालकांच्या प्रलंबित मागणीला जोर लावून व त्यांच्या अडी-अडचणी व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी
नूतन कार्यकारिणीची निवड उपस्थित संगणक परीचालकांच्या बैठकीत करण्यात आली. कार्यकारिणीत
अध्यक्षपदी अशोक पाटील,
उपाध्यक्षपदी किशोर सुर्यवंशी, सचिवपदी प्रभाकर बिरारी,
सहसचिव सचिन विंचूरकर,
कार्याध्यक्ष शाम पाटील
सल्लागार व प्रसिद्धीप्रमुख सागर मोरे
महिला अध्यक्ष ललिता भदाणे,
सदस्यपदी दिपक पाटील,
तुषार सनेर,नयना दोरकर,भाऊसाहेब वारूळे,शरद माळी
आदींची निवड झाली.त्यांच्या निवडीचे सर्व संगणक परीचालकांनी स्वागत व अभिनंदन केले.

0 Comments