नरडाणा--- म. दि. सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालय येथे येथे जागतिक एडस दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथील श्री. प्रशांत नंदुराव जाधव श्री.नरेंद्र जीवन देवरे समुपदेशक, आय. सी. टी. सी.यांची प्रमुख उपस्थिती होती या मान्यवरांनी जागतिक एडस दिनानिमित्त आपले एडस विषयी जनजागृती व काळजी, उपचार पद्धती यावर विचार मांडून एडस बाधा कशी होते हे सांगत असतांना कोरोना विषयी थोडक्यात माहिती महाविद्यालयात दिली.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. संजयकुमार सिसोदे अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. समाधान पाटील केले.
महाविद्यालयाचे वरिष्ट प्राध्यापक डॉ. एस.पी. ढाके, प्रा,महेंद्र नगराळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उपस्थित होते. विद्यार्थी यांनीही आपली उपस्थिती देऊन सहकार्य केले हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता डॉ. पी. जी. सोनवणे, एन एस. एस कार्यक्रम अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी परिश्रम घेतले. प्रमुख अतिथीचे आभार प्राचार्य समाधान पाटील मानले.

0 Comments