Header Ads Widget

सर्व समाजाला सोबत घेणारे आदर्श आमदार-संजय पाटील

सर्व समाजाला सोबत घेणारे आदर्श आमदार-संजय पाटील


    सुरवातीला प्रास्तविक करताना प्रास्तविक संजय पाटील म्हणाले की आमदारांच्या सूचनेनुसारच महानिर्वाण दिनीच हा सोहळा आयोजित केला आहे,स्व हरी अण्णांकडून मी बाळकडू घेतले असल्याने,पुढील काळात ही संस्था नक्कीच आर्थिक भरभराटीस आणण्याचा प्रयत्न करू,या संघात सर्व समाजाला सोबत घेण्याची पूर्वीच्या जेष्ठ नेत्यांची जी परंपरा होती तीच आमदार अनिल पाटील यांनी देखील जोपासली,येथे लहान असलेल्या मुस्लिम समाजाच्या ग्रामिण कार्यकर्त्याला देखील त्यांनी पण  दिला,याशिवाय राजपूत,माळी, मुस्लिम,धनगर,गुजर व मराठा तसेच देशासाठी पोलीस सेवेत चांगले योगदान देणारे मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासारख्या व्यक्तिमत्वास देखील त्यांनी स्थान दिले,अतिशय चांगली भावना त्यांची असून भविष्यात निवडणुकीस ही संस्था कशी प्राप्त होईल त्यासाठीच आमदारांनी हे प्रशासक मंडळ नेमले आहे,हा विश्वास नक्कीच सार्थकी लावू अशी ग्वाही देत,या प्रक्रियेसाठी राज्याचे सहकार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
          यावेळी राज्य ग्रंथालय समितीच्या अशासकीय सदस्यपदी सौ रिता बाविस्कर यांची नियुक्ती झाल्याने यांच्यासह आदर्श शिक्षिका सौ योजना पाटील,गौरव पुरस्काराबद्दल प्रा मंदाकिनी भामरे,शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती श्याम अहिरे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,प्रकाशचंद्र पारेख,मार्केटचे प्रशासक प्रा सुरेश पाटील,सौ कविता पवार,सौ वसुंधरा लांडगे,अँड तिलोत्तमा पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,राजू फाफॊरेकर , शिवाजीराव पाटील, शांताराम बापू, शिवाजी गोसावी,शेखा मिस्तरी,बन्सीलाल भागवत,आशा चावरीया नरेंद्र संदानशीव यासह महाविकास आघाडीतील काँगेस, राष्ट्रवादी व सेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर प्रथमच शेतकी संघाचा परिसर गर्दीने फुलला होता,सूत्रसंचालन संजय पाटील यांनी व आभार महेश देशमुख यांनी मानले.

यांचे झाले पद्ग्रहण

संजय पुनाजी पाटील (मुख्य प्रशासक), व सर्वश्री प्रशासक म्हणून माजी नगरसेवक भाईदास महाजन , भरत धनसिंग पाटील(खोकरपाट), रवींद्र कौतिक पाटील(जानवे), उमाकांत दिनकर पाटील(मारवड), धनराज पितांबर पवार (रुंधाटी), संजय भिला पाटील (पैलाड), सुधाकर यशवंत धनगर(करणखेडा), बाजार समितीचे माजी संचालक सुरेश पिरन पाटील(निंभोरा), अलीम हकीम मुजावर (धार), खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महेश देशमुख (गांधली), ज्ञानेश्वर गंगाराम पाटील(पैलाड), माजी अप्पर पोलीस अधीक्षक मंगलसिंग बळीराम सूर्यवंशी(कलाली) यांचे यावेळी पद्ग्रहण झाले.

Post a Comment

0 Comments