*शेतकरी जगाचा पोशिंदा, पण त्यांच्यावरच वीज महावितरणने कार्यवाही-गुन्हा दाखल करत आणली गदा....*
*जनमत-*
*दोंडाईचा-* महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आपल्या दुजाभाव कारभारामुळे महाराष्ट्रासह ग्रामीण भागापर्यंत नेहमी चर्चा-प्रसिद्धीस राहत असते. आजमितीला प्रसिद्धीस यायचे कारणही तसे आहे. दोंडाईचा पासुन हाकेच्या अंतरावर म्हणजे मोजून दहा किलोमीटरवर असलेल्या मालपूर गावात घरगुती वीज वापरणारें सह इतर तब्बल बावीस लोकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करून मोठा तीर मारत टीकेचे धनी ठरले आहेत. म्हणून आज दोंडाईचा शहर व परिसरातून त्यांच्या दुजाभाव कार्यवाही-वागण्याबद्दल जनतेतुन निषेध व्यक्त केला जात आहे.
आज मितीला मालपूर म्हणजे मुठभर चार-पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी काही उद्योग धंदे, कारखाने, मील,मोठमोठे व्यापार-व्यवसाय नाही आहेत. येथे जास्त करून लोक शेती व्यवसाय करून सोबत जोडधंदा म्हणून गुरे पाळतात व त्या मेहनतीच्या आलेल्या पैशातुन दैनंदिन कुटुंब प्रणालीचा कारभार चालवत असतात. त्यात त्यांना जर जीवनावश्यक वस्तु व इतर काही साहित्य खरेदी करायचे म्हटले तर दोंडाईचा हे शहर जवळ पडते. म्हणून दिवसा निम्मे लोक शेतात तर निम्मे लोक खरेदी निमित्त दोंडाईचा येथे आलेले असतात.म्हणून दिवसा ग्रामीण भागात खुप वीज वापरली जात असेल, असे भास होणे चुकीचे आहे. आजही सूर्य देवतेमुळे दिवसा ग्रामीण भागात ट्युबलाईटचा वापर जसा शहरात सर्रास चोवीस तास होतो,तसा केला जात नाही. फक्त रात्री केला जात असतो आणि त्यासाठी त्यांनी रितसर विज वितरण कंपनीची जो काही जोडणी खर्च आहे. तो त्यांनी कायदेशीर पैसे व फार्म भरून घेतलेला आहे. म्हणून घरगुती वीज वापरणारे दिवसा व रात्री वापरून-वापरून एक टि.व्ही,एक ट्युबलाईट,एक मोबाईल चार्जिंग यासाठी किती वीज वापरतील. ते काही कारखाना-मील चालवत नाही आहे की,त्यासाठी त्यांना वीज चोरी करावी लागेल. तसेच उद्योग धंदे करणारे ही काही मोठमोठे उद्योग धंदे-कारखाने-फँक्टरी घेऊन बसलेले नाही आहेत की, ते पण खुप मोठी वीज चोरी करतील. पण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मालपुर सारख्या मुठभर लहानशा गावात नऊ घरगुती वीज वापरणारे, बारा व्यवसायिक व एक लहान व्यापार करणाऱ्या लोकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करून,मोठा तीर मारत.सर्वत्र टीकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या ह्या धडाकेबाजशाही कार्यवाहीने ग्रामीण भागातील नागरिक वैतागून-आश्चर्यचकित झाले आहेत. ऐवढा मोठा फौजफाटा गावात आणत,यांना काय वरिष्ठ पातळीवर झेंडा गाडायचा होता का?असा प्रश्न स्वतः शी उपस्थित करत आहे.तर एकीकडे शिंदखेडा तालुका परिसरात अवकाळी पाऊस पडून शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे शेतात मजुरी करणाऱ्या लोकांच्या घरांची पडझड-नासधुस होत आहे.यांना धड तातडीने पंचनामा करून शासन स्तरावर अजुन मदत मिळाली नाही आहे. तेवढ्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी वीज बील वसुलीसाठी ग्रामीण भागाकडे तोंड वळवत रौद्ररूप धारण केले आहे.पण त्यातही ज्यांनी रितसर वीज जोडणी मागणी केली आहे, असे घरगुती वीज ग्राहकांवर जादा वीज वापराचे जास्तीचे बील न मागता सरसकट वीज चोरीचा गुन्हा दाखल केला जात आहे, हे लोकशाहीमध्ये चुकीचे आहे. उलट शहरी भागात जिथे जास्त वीज चोरी होण्याची शक्यता आहे. तेथे यांच्याने काही -पडत- कार्यवाही होत नाही व त्यात वीज चोर सापडले तरी त्यांना वेगळा न्याय देत. साहेब-सेठ-मालक-कारखानदार म्हणत.तडजोड उपलब्ध करत.दंड-व्याज लावून. जागेवर वीज बील भरायची सवलत दिली जाते.डायरेक्ट गुन्हे दाखल केले जात नाही. पण ज्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते.ज्याच्यावर अन्न उत्पादन करत,पुर्ण देश चालवण्याची जबाबदारी आहे. त्या अन्न दात्यांवर अशा अवकाळी पाऊसाच्या संकटावेळी वीज चोरीचा गुन्हा दाखल करणे. म्हणजे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शरमेची बाब आहे. म्हणून दोंडाईचा शहर व परिसरातुन चौफेर वीज वितरण मंडळ टीकेचे धनी ठरत असुन, त्यांच्या कार्यवाहीचा निषेध सर्वसामान्य जनतेतुन केला जात आहे.
0 Comments