विरदेल शिंदखेडा चिमठाणे महसूल मंडळात प्रचंड नुकसान
शिंदखेडा =प्रतिनिधी =कधी अवकाळी पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा संकटाने यावर्षी तर मोठी मजल गाठली आहे रब्बी पिकाची गेला महिन्याभरापूर्वीच पेरणी केली परंतु महिना उलटत नाहीत तोवरच गारपीट प्रचंड पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील विरदेल शिंदखेडा चिमठाणे या मंडळाचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे रब्बी पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शिंदखेडा तालुक्यात हवामान विभागाने अलर्ट केलेल्या नुसार आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गारपीट व पावसाने थैमान विरदेल मंडळात व चिमठाणे शिंदखेडा महसूल मंडळात या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे गारपिटीमुळे रब्बी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून दादर व हरभरा ही पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे दरम्यान महसूल प्रशासनाची संपर्क साधला असता अद्याप कुठलीही नोंद घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले परंतु रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे अशा तक्रारी आल्या असल्याचे देखील महसूल प्रशासनाने सांगितले शेतकऱ्यांचे रब्बी पिकांच्या शेतीचे पंचनामे करावे अशी जोरदार मागणी शिंदखेडा तालुका शिवसेनेने केली आहे

0 Comments