शिंदखेडा तालुक्यात मौजे दत्ताणे येथे आत्मा योजने अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम प्रसंगी शेतक-यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका तपासूनच खत व्यवस्थापन करावे जेणे करुन
खताचा समतोल वापर व खर्चाची बचत होवून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यास उत्तम मदत होते असे प्रतिपादन जिल्हा परीषद सदस्य, वर्षी व प्रगतीशील शेतकरी बापुसाहेब डी आर पाटील यांनी केले. दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी तालुक्यातील मौजे दत्ताणे येथे शेतक-यासाठी आयोजित कार्यक्रमाचे वेळी धुळे येथील कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्राज्ञ जगदिश काथेपुरी यांनी शेतक-यांना रब्बी हंगामातील गहू, हरभरा, उन्हाळी तीळ व भुईमुग पिकांचे उत्पादकता वाढीचे सुत्र यावर मार्गदर्शन करतांना वाणाची निवड, बिजप्रक्रीया, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पिक संरक्षण यावर कमी खर्चाचे शाश्वत तंत्रज्ञाना बाबत सोप्या भाषेत भाष्य केले.शेतकरी शास्त्रज्ञ सुंवाद प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुनिलकुमार राठी यांनी शेतकरी गट ,शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व शेतमालाचे विक्री व्यवस्थापन विषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करतांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,धुळे विठठल जोशी यांनी शेतक-यांना पिक उत्पादकता वाढीसाठी निसर्गाचा लहरीपणा ,शेतक-याकडील संसाधने व कृषि विषयक तंत्र यांची सांगड घालुन प्रयत्न करणे बाबत प्रतिपादन केले.शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद प्रसंगी वर्शी येथील बापुसो डी आर पाटील, दत्ताणे,अजंदे खू, परीसरीतील बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते.दत्ताणेचे सरपंच दिपाली दिनेश अहिरे,उपसरपंच राहुल पाटील व मान्यवरांचे हस्ते उन्हाळी तीळ उत्पादक शेतकरी यांना तीळ प्रात्यक्षिक निविष्ठा किट चे वाटप करण्यात आले. तसेच पोपट नाटू पाटील यांचे हरभरा पिक प्रक्षेत्रावर शिवार फेरी घेवून मार्गदर्शन करण्यात आले.
दत्ताणे येथील शेतकरी दत्तात्रय आसाराम पाटील,दाजभाउु बोरसे,अशेाक बोरसे,चंद्रकांत रतन देसले ,मिरची उत्पादक श्री वाघ - अजंदे खू ,धुळे जिल्हा कृषि पदवीधर संघाचे चेअरमन श्री सतिश पाटील ,कृषि अधिकारी नवनाथ साबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक विनय बोरसे ,तालुका कृषि अधिकारी,शिंदखेडा यांनी केले.सुत्र संचलन श्रीमती लालन राजपूत कृषि अधिकारी,शिंदखेडा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि पर्यवेक्षक, गणेश महाले ,कृषि सहाय्यक श्रीमती कुमुदिनी पाटील, मुकेश सोनवणे,विद्या पाटील,कपील चौधरी , निंबा पाटील तसेच संदिप पवार आत्मा बीटीएम ,शिंदखेडा यांनी विशेष परीश्रम घेतले.


0 Comments