Header Ads Widget

*दोंडाईचा नगरपालिका प्रशासकाचा अदलाबदल चा चमत्कार झाला तरी कसा ?*?


 



                   राज्यात अनेक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण होऊन मुदत संपली त्यादिवशी राज्य शासनाने अध्यादेश काढुन नगरपालिकांवर प्रशासकांची नेमणूक केली त्या अध्यादेशात दोंडाईचा नगरपालिकेचाही समावेश आहे. त्यांत दोंडाईचा नगरपालिकेचा प्रशासकपदी  तहसीलदार सुनिल सैदाणे यांची प्रशासक अधिकारी म्हणून नियुक्ती केली त्यामुळे  तहसीलदार सुनिल सैदाणे यांनी तात्काळ पदभार घेतला. दोंडाईचा शहराचे अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना वगळून तहसीलदार सुनिल सैदाणे यांची नेमणूक झाल्याने "कही खुशी, तो कही गम" अशी अवस्था राजकीय लोकांची झाली होती. अर्थात   काहींना आनंद झाला तर काहींचे अश्रूंआनावर झाले. आनंदीत झालेल्या देशमुख गटाच्या प्रमुख समर्थकांनी प्रशासक सुनिल सैदाणे यांचे स्वागत व सत्कार केला त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर टाकले फोटो पाहुन कदाचित काहीना रुचले नाही किवा त्या प्रशासकाची भीती वाटली असावी म्हणून त्यांच्या जागेवर अदलाबदली करून आपल्या मर्जीतले अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांची दुसर्याच दिवशी नेमणूक झाली. नेमणूक कसी झाली हा विषय संशोधनाचा ठरेल. काहींच्या मते जिल्हाधिकारी महोदय यांना अप्पर तहसीलदार यांना नियुक्त करायचे होते त्याठिकाणी तहसीलदारांना नजरचुकीने नियुक्त केले गेले. तर काहींच्या मते शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावळ यांना आपल्या मर्जीतले आणि आपल्या विरोधात कारवाई न करणारे प्रशासक म्हणून हवे होते म्हणून त्यांनी पालक मंत्री अब्दुल सत्तार यांना सांगून तुरंत आदला बदल करून घेतले. काहींच्या मते जिल्हाधिकारी महोदय यांना आमदार जयकुमार रावल यांच्या सांगण्यावरून पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक बंडू कुलकर्णी यांनी पालक मंत्री व जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून, काही देणे घेणे करून सदर  आदला बदल करण्याचे बोलवले जात आहे. परंतु एकाच दिवसात प्रशासकाची बदली करून  मर्जीतले  प्रशासक आणण्यात राजकीय हस्तक्षेप होवून भाजपाचे आमदार जयकुमार रावल हे महा विकास आघाडीचे, शिवसेनेचे गोटातील  पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निकटचे असल्याने महा विकास आघाडीच्या नेत्यांचे न ऐकता फक्त आमदार जयकुमार रावल यांचे ऐकतात असा संदेश संपूर्ण जिल्ह्यात गेला आणि तशी परिस्थिती सत्य असल्याचेही शिवसेनेच्या अंतर्गत गोटात कुजबूज सुरू आहे. अश्रूंआनावर आनंदीत होऊन रावल गटाचे प्रमुख समर्थक यांनी प्रशासक सुदाम महाजन यांचे स्वागत व सत्कार केला. पहिल्या प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे दोंडाईचेचे स्थानिक नेते करतात. तर दुसऱ्या बदलून आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे व आमदारांचे समर्थक करतात.असला प्रकार कुठेच घडला नाही तो प्रकार दोंडाईचात घडतो. 
    एका दिवसात नगरपालिकेच्या प्रशासकाची अदलाबदली करण्याचा चमत्कार घडवून  राजकारणी किती चमत्कारित  आहेत याचा भास होतो. सत्ता महाविकास आघाडीची, पालक मंत्री शिवसेनेचा परंतु राजकीय दबदबा मात्र भारतीय जनता पार्टीच्या आमदार जयकुमार रावल यांचाच अशी सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ता कोणाचीही असो परंतु धुळे जिल्ह्यात प्रशासनावर दबदबा मात्र भाजप आमदार जयकुमार रावल यांचा राहिल असे एकंदरीत स्पष्ट झाले आहे. म्हणून धुळे जिल्ह्यात निलंबित आमदार जरी असले तरी पालक मंत्री अब्दुल सत्तार व त्यांचे स्वीय सहाय्यक बंडू कुलकर्णी यांच्या आशीर्वादाने दबदबा भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल यांच्याच राहील...

*दैनिक सच्ची पुकार*साभार
    

Post a Comment

0 Comments