शिंदखेडा--- काल दि.७ जानेवारी रोजी सायंकाळी शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शेतकऱ्यांचा तोंडी आलेला रब्बी हंगामाचा घास हिरावला गेला.
दादर, गहू, हरभरा व इतर पिकांसह फळबागांचेही नुकसान झालेले आहे. त्यापैकी वरपाडे, अमळथे, नेवाडे येथे आज पाहणी केली व या संदर्भात संबंधित विभागाला धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मा. संदीप दादा बेडसे यांनी तात्काळ पंचनामे करून न्याय मिळवून देण्याबाबत विनंती केली.
तसेच वरपाडे गाव परिसरातील विद्युत पोल पडल्यामुळे गावाला पिण्यास पाणी नव्हते. दादांनी स्वतः पदरमोड करीत जनरेटर मशीनच्या डिझेलचा खर्च करून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदखेडा शहराध्यक्ष प्रविण पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील तसेच वरपाडे गावातील चंद्रकांत भास्कर पवार, माजी सरपंच दीपक रघुनाथ पवार, संजय पवार, भटू चौधरी, दीपक पवार, अनिल जाधव, सागर पवार, संदीप पवार, दुर्गादास पवार, ऍड किशोर पाटील, आण्णा पाटील आदी शेतकरी बांधव तसेच अमळथे गावातील रामदास नारायण पवार, भीमराव पवार, गुलाब नारायण पवार, वनाजी शंकर पवार, गजेंद्र पवार, संजय पवार, पंडित पवार, हिम्मत पवार, भटु पवार, निंबा पवार, हरेश पवार, तुषार पवार, परेश पवार, उदय गिरासे, संतोष पवार, गोपाल गिरासे, प्रकाश पवार, मनोहर पवार, इंदास पवार, हरीचंद्र पवार, मधु पवार, भैय्या पवार, राजु धनगर, भाईदास कोळी आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.



0 Comments