Header Ads Widget

*शिंदखेडा मतदारसंघात गारपीट व अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान..* *शासनाने तातडीने मदत करावी माजी मंत्री आ. जयकुमारभाऊ रावल यांची मागणी..*




 शिंदखेडा मतदारसंघात म्हणजेच संपूर्ण शिंदखेडा तालुक्यासह साक्री तालुक्यातील दुसाणे महसुल मंडळातील गावामध्ये आज प्रचंड प्रमाणात गारपीट आणि अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतातील हरभरा, ज्वारी(दादर), तुर व कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.  तसेच वादळी वा-यामुळे अनेक घरांची पत्रे उडाली अनेक कुटुंबांचे आजच निवाऱ्याची सोय हिरावली गेली आहे. सरकारने त्यांचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ सरसकट मदत करावी अशी मागणी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमारभाऊ रावल यांनी केली आहे. 

  आज शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे, नेवाडे, सोनेवाडी, अमळथे भागात प्रचंड अशी गारपीट झाली असून दोंडाईचा परीसरात प्रचंड वादळी वा-यासह पाऊस झाला आहे, शिवाय वादळामुळे विखुर्ले, रहिमपुरे, कुरूकवाडे येथे घरांचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, एकटया कुरूकवाडे गावात तब्बल 20 पेक्षा अधिकच्या घरांची पत्रे उडाली असून काही मातीची घरे कोसळली आहेत याचा तातडीने पंचनामा करण्याच्या करावा व तात्काळ मदत मिळण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी आ. जयकुमारभाऊ रावल यांनी केली आहे. 
      गेल्या 2 वर्षापासुन शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना मोदी सरकारमार्फत दिले जाणारे किसान सन्मान योजनेच्या मदतीशिवाय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणतीही ठोस मदत केलेली नाही, कोरोनाच्या काळात शेतमालाला अत्यंत कमी दर मिळत असतांना बाकीच्या राज्यांनी शेतक-यांसह, 12 बलुतेदार, छोटे मोठे व्यावसायीक अशा सर्वच घटकांना मदत केली पंरतू महाविकास आघाडी सरकारने अदयाप कोणतीही मदत केलेली नाही, किमान आता आमच्या बळीराजा सर्वसामान्यांचे अवकाळी पाऊस आणि गारपीटीने पिके आणि घरे उध्वस्त केले असून सरकारने तात्काळ कार्यवाह करीत मदत जाहीर करावी. आता सरकारने शेतकऱ्यांचा सहनशिलतेचा अंत पाहू नये असेही आ. जयकुमारभाऊ रावल म्हणाले.

Post a Comment

0 Comments