नरडाणा---म. दि. सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालय नरडाणा येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती ही साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील यांनी अध्यक्ष पद भूषवून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले सोबत नरडाणा महाविद्यालयातील वरिष्ट प्राध्यापक प्रा. सोनार प्रा व्ही. बी खैरनार, डॉ एस. एम. सिसोदे, बी. एम पाटील. प्रा एन, वाय खैरनार यांच्या सोबत प्राध्यापक वृंद उपस्थित होते रत्नमाला सिसोदे ज्युनियर कॉलेजचे सर्व स्टॉफ प्रा.शरद भामरे, प्रा. एस. टी भामरे, प्रा. पी. जी. पाटील प्रा. सौ कढरे, प्रा उमेश पाटील यांची ही उपस्थिती होती या कार्यक्रमसाठी ओ. एस. श्री आर.ओ पाटील, प्रशांत सिसोदे वडनेरे भाऊसाहेब, अनिल पवार, बी जी सिरसाठ संजय बोरसे यांनी परिश्रम घेतले यांना एन. एस. एस कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. सोनावणे व प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी सहकार्य केले. खूप उत्साहाने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

0 Comments