Header Ads Widget

*श्रमसफल्या एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*




अमळनेर---दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी श्रमसफल्या एज्युकेशन सोसायटी संचलित, पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने 73 व्या प्रजासत्ताक दिन संपन्न झाला. संस्थेचे सन्माननीय संचालक मा. अभिजीत भंडारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे सर्वांनी वाचन केले, तसेच कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मतदारांसाठीची प्रतिज्ञा सामूहिक पद्धतीने घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भरत खंडागळे यांनी केले तर कार्यक्रमासाठी श्री. अमोल पाटील, प्रतिष्ठित नागरिक भोरटेक, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. विनोद वैद्य आणि संस्थेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व काही विद्यार्थी उपस्थित होते. 
  या ध्वजारोहण कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले..

Post a Comment

0 Comments