अमळनेर - दि.25 जानेवारी 2022 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.25 जानेवारी 2022 या दिवशी *राष्ट्रीय मतदार* दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी *प्रा डॉअस्मिता सरवैया* यांनी केले, *प्रा.डॉ. अस्मिता* यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट करताना सांगितले की, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणि 25 जानेवारी 1950 निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. माजी राष्ट्रपती *श्रीमती प्रतिभाताई पाटील* यांनी या घटनेला 61 वर्षे पूर्ण झाली म्हणून *मतदार दिन* हा राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात यावा असे सुचवले. *प्रा.डॉ. भरत खंडागळे* विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मतदानाविषयी कर्तव्य पार पाडले पाहिजे, 18 वर्षे वयाच्या वरील व्यक्तिने स्वतःहून आपली मतदार म्हणून नोंदणी करून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. *प्रा. डॉ. एस,
आर.चव्हाण* यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, आपण भावी पिढीचे सुजाण नागरिक आहात, आपण आपआपल्या परीने मतदान दिनाचे महत्त्व आपल्या परिसरात फिरून जाणीव जागृतीचे कार्यक्रम राबवावेत. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजना पारोळा विभागाचे समन्वयक *प्रा.डॉ.जगदीश सोनवणे* यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्याच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती केली पाहिजे, समाजात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य पाठविले होते... अशा सर्व विद्यार्थ्यांचे डॉ.जगदीश सोनवणे यांनी कौतुक केले. याबाबत कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना *प्रा डॉ श्वेता वैद्य* म्हणाल्या की, मतदान या शब्द संकल्पनेचा अर्थ विसृत स्वरूपात मांडला तसेच मतदानाचा मिळालेला अधिकार हा संविधानिक असून त्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले, या प्रसंगी सर्व उपस्थितांनी *प्रा.डॉ. अनिता खेडकर* यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली.
राष्ट्रीय मतदार दिना निमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धा, कविता व घोषवाक्य, रांगोळी, चित्रकला, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्याने *विद्या पाटील,निशिगंधा पाटील, माधुरी पाटील,अक्षदा पाटील, सोनवणे महिमा, गवळी माधुरी, पारधी तेजस*, इ विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाला चोपडा समाजकार्य महाविद्यालयातील *प्रा डॉ राहूल निकम, प्रा डॉ मारुती गायकवाड, प्रा डॉ सोनकांबळे* तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी *दिव्यांनी पाटील* आभार प्रदर्शन विद्यार्थिनी *सुप्रिया बोरसे आणि रुपाली पाटील* यांनी केले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयचे प्राचार्य *डॉ.पी एस पाटील* यांच्या मार्गदर्शनातून *प्रा डॉ जगदीश सोनवणे*, विभागीय समन्वयक, रासेयो, *प्रा.डॉ.अनिता एम. खेडकर,* विद्यार्थी विकास अधिकारी *प्रा. चंद्रशेखर बोरसे* सहाय्यक विद्यार्थी विकास विभाग *प्रा. डॉ. अस्मिता धनवंत सरवैया* राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, *प्रा विजयकुमार वाघमारे,* सहाय्यक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, *प्रा. डॉ.सागरराज चव्हाण* *प्रा. डॉ.भरत खंडागळे* *प्रा. डॉ.श्वेता वैद्य प्रा.डी.आर.ढगे* कार्यालयीन अधिक्षक *श्री अनिल वाणी* सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.
0 Comments