Header Ads Widget

शिरपुर तालुक्यात संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी

धुळे: शिरपुर तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

शिरपूर (Shirpur) तालुक्यात जवळपास एक तास जोरदार पावसासह गारपीटही (Hail) झाली. अचानक झालेल्या गारपिटीमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. तसेच या अवकाळी पावसाने (Untimely Rain) शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. (Heavy hailstorm with unseasonal rains in Shirpur taluka of Dhule district)

हे देखील पहा -

भारतीय हवामान (Weather) विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी राज्यात पुढील तीन ते चार तासात विविध ठिकाणी पाऊस पडेल, अशी माहिती दिली होती. देशाच्या उत्तरेकडील भागात पाश्चात्य विक्षोभामुळे 6 ते 10 जानेवारीला, काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली होती.

Post a Comment

0 Comments