नरडाणा---कला, वाणिज्य महाविद्यालय नरडाणा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग जळगाव तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार दि.25/01/22रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.भारतीय मतदारांची लोकशाहीवर निष्ठा असावी म्हणून मतदार दिवशी शपथ घेण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील अध्यक्षस्थानी होते. शपथ घेतांना वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.या प्रसंगी निवडणूक साक्षरता मंडळ याची देखील निवड करण्यात आली यात वरिष्ठ प्राध्यापक यांचा समावेश करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्या करता. एन. एस. एस कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. सोनवणे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे परिश्रम घेतले.

0 Comments