धुळे : शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. गोडाउनमध्ये ठेवलेला लाखोंचा मुद्देमाल आगीमध्ये जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात असून गोडाऊन जवळ लावलेला छोटा हत्ती वाहन देखील या आगेच्या भस्मस्तानी आल्यामुळे जळून खाक झाला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून, अग्निशमन विभागातर्फे ही आग आटोक्यात आणण्याचा शर्तीचा प्रयत्न करण्यात येत आहे.

0 Comments