शिंदखेडा---(यादवराव सावंत) तालुक्यातील कमखेडा येथील लग्न समारंभात ना घोडा ना डीजे शेतकरी पुत्राने स्व मालकीच्या सजविलेल्या ट्रॅक्टर वर आपल्या लग्नाची मीरवणुक गावातुन काढण्यात आली आधी ट्रॅक्टर नंतर लग्न स्वतः ताने काबाडकष्ट करून घेतल
लग्न म्हटले म्हणजे मान पान रढी परंपरा चालीरीती रस्ते फुगवे बँड डीजे घोडा बगी इत्यादी तसेच कसे थाटात लग्न संपन्न होईल व आतल्या लग्नाची प्रतिष्ठा लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळी ना दिसेल या खर्चात अनेक माता-पिता कर्जबाजारी झाले लग्न वधू वर प्रतिष्ठा जपण्यासाठी अनाथायी खर्च करून प्रतिष्ठा दाखवण्याचा वर पिता कर्जबाजारी होऊन प्रयत्न करतात मात्र या प्रतिष्ठेला तिलाजली देत कामखेडा येथील कोळी समाजातील दिलीप कोळी यांच्या मुलगा विजय व शिरपूर तालुक्यातील गुजर खदै येथील शरद दावळे यांची कन्या रूपाली यांच्या विवाह कमखेडा येथे दिनांक 21 मे रोजी दिनांक रविवारी संपन्न झाला विजय हा युवक आयटीया करून मुंबई पुणे नाशिक येथे नोकरी करू शकला असता मात्र नोकरीच्या मागे न लागता उत्तम शेती तसेज स्व मालकीचे सोनाली कंपनीचे ट्रॅक्टर घेऊन आपला चरितार्थ चालवित आहे कोळी समाजातील आदर्श शेतकरी पुत्राने जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आयटीआय असून देखील उत्तम प्रकारे शेती सांभाळून आपल्या मालकीची ट्रॅक्टर घेऊन नोकरीच्या मागे न लागता ट्रॅक्टर व्यवसायातून उत्तम शेती सांभाळत आहे आधी नवीन ट्रॅक्टर मग नंतर लग्न हा निश्चय मनाशी बाळगून या युवकांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर व आत्मविश्वासाच्या फळावर आपल्या मेहनतीच्या बळावर लग्न समारंभात स्वतःच्या मालकीच्या नवीन सोनालिका ट्रॅक्टर वर नव वधू व नवरदेव व संपूर्ण गावात मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला व आपला अभिमान बाळगला तसेच लग्नातील आनाढायी खर्चाला लगाम देऊन अतिशय साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला याबद्दल त्यांचा कमखेड्यातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या धाडसी व जिदी नवरदेवाच भडणे येथील आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांचे हस्ते नव वधुचा सत्कार या शेतकरी अभिमाना बद्दल सत्कार करण्यात आला पंचक्रोशीत या लग्न समारंभाचा कौतुकाच्या विषय ठरला एवढे मात्र निश्चित
0 Comments