शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक २०२५ दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी अँड. नेहा प्रताप सरदार हिचा अनुसुचित जाती जागेवर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनु. क्र. अ. मध्ये फॉर्म भरला. प्रताप सरदार यांनी यापुर्वी दोनदा भाजपाकडुन निवडणुक लढवली आहे. याच प्रभागातुन गेल्या निवडणुकीत सौ. वृशाली प्रताप सरदार यांनी भाजपा कडुन निवडणुक लढविली व फक्त 90 मतांनी पराभुत झाल्या होत्या. प्रताप सरदार यांनी भाजपा अनु. जाती मोर्चा धुऴे जिल्हाध्यक्ष म्हणुन दोनदा यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. प्रताप सरदार यांनी भाजपा पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागणी केली आहे. मात्र आता शिवनपा निवडणुकीत भाजपा तर्फे उमेदवारी मिऴेल अशी अपेक्षा आहे. प्रभाग 7 मध्ये अनुसुचित जाती जागेसाठी अ मध्ये प्रताप सरदार यांची मुलीने आज भाजपा व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. अँड. नेहा प्रताप सरदार हिचा प्रभाग 7 अ मध्ये नगर सेविकपदासाठी फॉर्म भरतेवेऴी धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, खंडेराव मंदीर उपाध्यक्ष संजय आसापुरे, प्रताप सरदार, महेंद्र पाटील, मुबीन शेख आदि उपस्थित होते.
0 Comments