Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच "बालदिन" व विविध खेळ इ. कार्यक्रम संपन्न

सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री सी जी वारुडे 
    शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच "बालदिन" व विविध खेळ इ. कार्यक्रम  संपन्न करण्यात आला.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय, आबासाहेब श्री एस ए कदम सर यांच्या हस्ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.   
        तद्नंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवन शैली विषयी मनोगत व्यक्त केले.
        शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मार्गदर्शन मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी पंडित जवाहरलाल नेहरू हे विज्ञानाचे उपासक होते जेव्हा समाजाच्या कुठल्याही घटकांमध्ये ते सहजतेनं वावरत ते लहान मुलांत वावरतांना ते लहानाहुन लहान होत, त्यांच्याशी खेळणं, गोष्टी सांगणं याची त्यांना भारी हौस! व लहान मुलांचंही त्यांच्यावर फार प्रेम सारी मुलं त्यांना "चाचा नेहरू" म्हणत. नेहरू म्हणत की, मुलं म्हणजे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत.या देशाची प्रगती, विकास त्यांच्याच आहे याची त्यांना जाणीव होती व मुलं हा राष्ट्राचा अमोल ठेवा आहे,तो प्राणपणानं जपला पाहिजे.व त्यांनी ग्रामीण भागाचा दौरा प्रसंगी भारताचा शेतकरी कसा राहतो,कसा जगतो,कसा विचार करतो याचा जवळून अभ्यास केला तेव्हा दारिद्रयाचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन झाले तेव्हा म्हणत शेतकऱ्यांचे जीवन जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देशात शांती आणि समृद्धी येणार नाही त्यासाठी प्रथमतः देश स्वतंत्र झाला पाहिजे स्वातंत्र्य संग्राम चळवळ इत्यादी व "भारताच स्वातंत्र्य समृद्धी व प्रगती या ध्येयासाठी उभी हयात व्यतीत करणारे नेहरू हे खरं तर मानवतेचे महान उपासक होते जागतिक शांततेसाठी ते आयुष्यभर झटले शांतिदूत सारं जग त्यांना ओळखतं."इ.विषयी महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना बालदिनाच्या निमित्ताने सांघिक व वैयक्तिक खेळ व मनोरंजन खेळ खेळवण्यात आले.
    यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग मुख्याध्यापक शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी कर्मचारी वृंद उपस्थित होते. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन - श्री.आर.बी.गवळे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments