बेटावद प्रतिनिधी.
बेटावद : शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड बेटावद या संस्थेच्या चेअरमन सौ खटाबाई सुपडू माळी यांनी राजीनामा दिल्यामुळे झालेल्या रिक्त पदावर आज दिनांक 18 .11.2025 मंगळवार रोजी झालेल्या चेअरमन पदी निवड म्हणून बेटावद येथील दलित समाजातील समाज कार्यकर्ते बलराज चुडामन थोरात यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली
निवडणुकीत बलराज थोरात यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड सहकार अधिकारी सुशील महाजन यांनी सुचित केल्याने आनंद उत्सव साजरा करण्यात आला बलराज थोरात यांचे विकास सोसायटीचे सर्व संचालक मंडळांनी व निवडणूक अधिकारी व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास सोसायटीचे सर्व संचालक मंडळ हजर होते गटप्रमुख संचालक सुजित पवार, लोटन महाजन, भटू माळी, अशोक पाटील, अनिल महाले, माझी चेअरमन खटाबाई सुपडू माळी ,चुडामन माळी, वसंत माळी, अरुण माळी, निर्मला अशोक पाटील ,राजेंद्र माळी, रमेश वाणी ,परविन देशमुख, हरिश्चंद्र भोई ,इत्यादी सदस्य हजर होते कार्यक्रम यशस्वी साठी सेक्रेटरी यशवंत जयराम सोनगडा शिपाई बुवा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी झाला
बलराज थोरात यांची निवड झाल्याने भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नथा आबा वारुडे बेटावद ग्रामपंचायतचे सरपंच मंगलचंद जैन, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कोळी. ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच गणेश माळी, विजय बागुल , पाष्ट्याचे विकास सोसायटी सेक्रेटरी संजय थोरात, प्रशांत माळी ग्रा. पं.सदस्य, हंसराज माळी आदींनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
0 Comments