बेटावद प्रतिनिधी
बेटावद येथील भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले
गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी महामानवाच्या स्मृतीस वंदन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य दीपक पवार आणि प्राचार्य पी. के. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रथम पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी जमदाडे सर, निकुंभे सर, आर. टी. माळी , सचिन पाटील, चेतन पाटील,एस पी माळी, यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होता.
याप्रसंगी सरपंच मंगलचंद जैन, सुजित पवार, वसंत आबा माळी, ग्रामसेवक प्रमोद खलाणे, लोटन महाजन, देवाजी भाऊ, बापू भोई, महेंद्र माळी, गणेश माळी, पोलीस पाटील शालीक कोळी, दिलीप वाघ, पावभा कोळी, रहीम पठाण आणि नंदकिशोर पाटील आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूलाल मैराळे यांनी उत्कृष्टरित्या केले, तर बलराज थोरात यांनी उपस्थितांकडून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांनी एकजुटीने अभिवादन केले.
यावेळी समाजातील विलास महाले, अशोक वाघ, मनोज ढिवरे, दीपक सोनवणे, रमेश थोरात, सिताराम थोरात, शिवदास थोरात, सुनील बागले, अभिजीत मैराळे, अक्षय जावळे, सुनील मैराळे, आनंद खैरनार, दिनेश ढिवरे, दादा भाऊ मैराळे, खंडेराव मैराळे, विष्णू पेंटर यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments