सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री सी जी वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच " महापरिनिर्वाण दिवस" साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात "महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर "महापरिनिर्वाण दिन" साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आबासाहेब
श्री एस ए कदम सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंतर विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भाषणे केलीत त्या नंतर विद्यालयातील शिक्षकांनी ही बाबासाहेबांच्या विचारांविषयी मनोभाव व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आबासाहेब श्री एस ए कदम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व्यक्त करताना म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेबांना भारतीय "राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते.
"राज्यघटना" म्हणजे काय मी, तुम्ही,आपण, आपल्या आजूबाजूला असलेले सर्व लोक हे भारताचे नागरिक आणि महाराष्ट्राचे रहिवासी आहोत आणि आपणा सर्वांचे जीवन योग्यरितीने जगता यावे वा विकास करता यावा यासाठी असणारे नियम, अधिकार, नीती या विषयी ची सर्वांगीण माहिती म्हणजे "राज्य घटना "होय.
त्यांनी संविधान,महाडचा सत्याग्रह,दीन दलितांमध्ये शिक्षण जागृती, बहिष्कृत भारत, उन्नतीचे मूलमंत्र, शिका संघर्ष करा व संघटीत व्हा! इ.विषयी व शेवटी बाबासाहेबांनी भारतीयांना संदेश देताना म्हणाले की,"देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे "असा हा अमर संदेश आपणास देवून गेलेत व "सुसंस्कृत मन शिक्षण ही स्वातंत्र्यासाची प्रेरक शक्ती मानते,शिक्षण हे माणसाला विचार देते; "शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे", तसेच " शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे कोणी प्राशन केले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही"!इ.विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी वर्ग,मा.मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -श्री.एस.बी.भदाणे सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन - श्री.पी आर पाटील सर यांनी मानले.व कार्यक्रमाची सांगता "वंदे मातरम्" या राष्ट्रीय गीताने करण्यात आले.
0 Comments