Header Ads Widget

जामनेपाडा तालुका साक्रीचे प्राथमिक शिक्षक शंकर चौरे यांचा शिक्षण उपसंचालकांच्या हस्ते उपक्रमशिल शिक्षक म्हणून गौरव



 

साक्री- ‘नवी दिशा नवे उपक्रम’ या राज्यस्तरीय समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील  निवडक अशा ५० उपक्रमशील शिक्षकांचा " नवी दिशा नवे उपक्रम " या पुस्तकचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान व गुणगौरव सोहळा दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी  राष्ट्र सेवा दलाचे साने गुरुजी सभागृह, सिंहगड रोड, पुणे येथे आदरणीय देवराव चव्हाण यांच्या  मार्गदर्शनाखाली अगदी उत्साहात पार पडला. या वेळी आदरणीय विकास गरड साहेब, माजी शिक्षण उपसंचालक व वरिष्ठ आधिव्याख्याता, डाएट पुणे,  आदरणीय शुभांगी चव्हाण मॅडम ,उपप्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग मनपा पुणे, मा. शिवाजी खांडेकर, प्रशासकीय संचालक राष्ट्र सेवा दल.  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील  ५० उपक्रमशिल शिक्षकांचा आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या ५० उपक्रमशील शिक्षकांमध्ये शंकर सिताराम चौरे, जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र - रोहोड ता. साक्री जि. धुळे यांचाही सन्मान करण्यात आला.  यासाठी शंकर चौरे यांना गटशिक्षणाधिकारी पं. स.साक्री मा. राजेंद्र पगारे साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती एस. एस. भामरे मॅडम,  केंद्रप्रमुख मा. श्री. वा. रा. सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. शंकर चौरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Post a Comment

0 Comments